‘मोनूला शिक्षा देऊ नका...’, त्यानं प्रेम केलं, पण तिनं छळलं, चिठ्ठी लिहून तरुणानं सगळंच संपवलं, संभाजीनगरात खळबळ
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: श्रीकांत याने भाग्यश्रीला प्रेमाची साद घातली होती, मात्र तिने नकार दिला. त्यानंतर भाग्यश्री, तिचा प्रियकर, बहिण व इतरांनी...
छत्रपती संभाजीनगर : प्रेमाची साद घातली, मात्र नकार मिळाला… आणि त्यानंतर सुरू झाला मानसिक छळ. हा छळ इतका असह्य ठरला की अखेर एका तरुणाने मृत्यूला कवटाळले. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून 22 वर्षीय तरुणाने सुसाईड नोट लिहीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना 9 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास जाधववाडी परिसरात घडली. श्रीकांत उर्फ शक्ती गोरख शिंदे (22) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणात सुसाईड नोटच्या आधारे भाग्यश्री उर्फ मोनु रामचंद्र निळ, जयश्री रामचंद्र निळ (दोघी रा. हास्ता ता. कन्नड), कुलदीप उर्फ तेजस बळीराम निकम (रा. गवाली ता. कन्नड, ह.मु. मिटमिटा पडेगाव), सुमेबोध उर्फ सुमीत कुंडलिक पडघान (रा. पिशोर ता. कन्नड) व गुरुदत्त रासने (रा. पिशोर ता. कन्नड) यांच्याविरोधात हसुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पिशोर (दिगर) (ता. कन्नड) येथे राहणारे गोरख संगराव शिंदे (60) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, त्यांचा मुलगा श्रीकांत उर्फ शक्ती हा मागील दोन वर्षांपासून जाधववाडी भागात राहत होता. तो सायबर सिक्युरिटीशी संबंधित क्लास करत होता. 9 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 8 वाजता श्रीकांत याने जाधववाडी येथील राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच 10 डिसेंबर रोजी पहाटे 1.15 वाजता त्याची प्राणज्योत मालावली.
advertisement
‘मोनुला शिक्षा देऊ नका’
श्रीकांत याने भाग्यश्रीला प्रेमाची साद घातली होती, मात्र तिने नकार दिला. त्यानंतर भाग्यश्री, तिचा प्रियकर, बहिण व इतरांनी श्रीकांतचा छळ केल्याचा उल्लेख तपास अधिकारी उपनिरीक्षक सचिन पागोटे यांनी केला आहे. विशेष म्हणजे आत्महत्येच्या टोकाच्या निर्णयानंतरही श्रीकांतने सुसाईड नोटच्या शेवटी एक भावनिक उल्लेख केला असून, “मोनुला शिक्षा देऊ नका आणि तिला कोर्टात नेऊ नका,” अशी विनंती त्याने केली असल्याची माहिती पागोटे यांनी दिली.
advertisement
सुसाईड नोटने उडाली खळबळ
पोलिसांनी खोलीची तपासणी केली असता तेथे श्रीकांतने लिहिलेली सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत वरील पाच लोकांमुळे आपण मानसिक तणावात असल्याचे आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्टपणे लिहिले आहे. तसेच आपल्या लॅपटॉपमध्ये संबंधित व्यक्तींचे फोटो सेव्ह करून ठेवल्याचा उल्लेखही सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी सुरुवातीला हसुल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र सुसाईड नोट आणि वडिलांच्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तींविरुद्ध आत्महत्ये स प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 10:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
‘मोनूला शिक्षा देऊ नका...’, त्यानं प्रेम केलं, पण तिनं छळलं, चिठ्ठी लिहून तरुणानं सगळंच संपवलं, संभाजीनगरात खळबळ








