प्रशांत बनकरला आधीच माहीत होतं डॉक्टर तरुणी जीव देणार? 'त्या' एका मेसेजने खुलासा, फलटण प्रकरणात मोठी अपडेट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Satara Woman Doctor Death Case: सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता नवनवी माहिती समोर येत आहे.
Satara Woman Doctor Death Case: सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता नवनवी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर यांना अटक केली आहे. या दोघांची नावं तळहातावर लिहून महिलेनं आयुष्याचा शेवट केला होता. बदणे याने आपल्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केला. तर प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचं तरुणीने सुसाईड नोटमध्ये म्हटलं.
या सगळ्या घडामोडीनंतर आता घटनेच्या रात्री म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी नक्की काय घडलं होतं? याचा घटनाक्रम समोर आला आहे. याबाबतचा खुलासा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केला आहे. डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात माहिती घेण्यासाठी त्या सोमवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी यासंदर्भात संयुक्त यंत्रणांशी चर्चा करून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाच्या विविध पैलूंवर भाष्य केलं.
advertisement
याबाबत माहिती देताना चाकणकर म्हणाल्या की, लक्ष्मीपूजनाला डॉक्टर महिला प्रशांत बनकरच्या घरी दिवाळीसाठी गेली. फोटो काढण्यावरून मोठा वाद झाला. दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर त्या घरातून निघाल्या. बाजुच्या एका मंदिरात गेल्या. यावेळी प्रशांत बनकरच्या वडिलांनी तिची समजूत घालून तिला परत आणलं. त्यानंतर ती हॉटेलला गेली.
हॉटेलवर गेल्यानंतर तिने रात्रभर प्रशांतला मेसेज केले. पण त्याचा फोन बंद होता. पण त्याचा फोन बंद होण्यापूर्वी मी आत्महत्या करेन, असा मेसेज डॉक्टर तरुणीने केला होता. पण तू यापूर्वीही आत्महत्येची धमकी दिली होती, असं प्रशांतने तिला म्हटलं आणि तिच्या मेसेजकडे दुर्लक्ष केलं. यानंतर रागाच्या भरात तरुणीने जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. याबाबतचा खुलासा रुपाली चाकणकर सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
October 28, 2025 1:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रशांत बनकरला आधीच माहीत होतं डॉक्टर तरुणी जीव देणार? 'त्या' एका मेसेजने खुलासा, फलटण प्रकरणात मोठी अपडेट


