साताराकरांनो लक्ष द्या! कास जलवाहिनीला पुन्हा गळती; 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला पुन्हा गळती लागल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. ही गळती दुरुस्त करण्यासाठी...
सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला पुन्हा एकदा गळती लागल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या गळती दुरुस्तीच्या कामामुळे बुधवार (दि. 6 ऑगस्ट) आणि गुरुवार (दि. 7 ऑगस्ट) शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या काळात नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.
जुन्या जलवाहिनीमुळे वारंवार त्रास
1986 पासून सुरू असलेल्या कास पाणीपुरवठा योजनेत 1997 मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. मात्र, अजूनही जुनी जलवाहिनीच वापरली जात आहे. पाण्याचा दाब जास्त असल्यामुळे आटाळी आणि कासाणी गावाजवळ या जलवाहिनीला वारंवार गळती लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालिकेने नवीन जलवाहिनीचे काम गतीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
advertisement
कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?
बुधवार, 6 ऑगस्ट : कास योजनेच्या माध्यमातून पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी, डोंगराळ भागातील बालाजी नगर, कांबळे वस्ती, जांभळेवाडा आणि कात्रेवाडा टाकीतून होणारा सायंकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद राहील.
गुरुवार, 7 ऑगस्ट : पॉवर हाऊस येथून यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ, कात्रेवाडी टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी आणि कोटेश्वर टाकीतून होणारा सकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या दोन्ही दिवशी पाणी येणार नसल्याने नागरिकांना पाण्याची बचत करून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
advertisement
हे ही वाचा : रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता मिटली! पाऊस कमी असला तरी धरणे तुडुंब, 81 टक्के पाणीसाठा!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 05, 2025 11:14 AM IST
मराठी बातम्या/सातारा/
साताराकरांनो लक्ष द्या! कास जलवाहिनीला पुन्हा गळती; 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद