कॅबिनमध्ये एकटीला जेवायला बोलवलं अन्.., शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य, अधीक्षकाला अटक

Last Updated:

Crime in Hingoli: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका शिक्षकाने शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे.

News18
News18
वारंगा फाटा: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका शिक्षकाने शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं पीडित मुलीला एकटीला ऑफिसमध्ये बोलवून तिच्यासोबत लैंगिक चाळे केले आहेत. या प्रकरणी पीडित मुलीने बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. बाळापूर आखाडा पोलिसांनी 'पोक्सो' (POCSO) आणि 'अॅट्रॉसिटी' (Atrocity) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कळमनुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेत ११ वर्षीय पीडित मुलगी निवासी राहून शिक्षण घेत आहे. पीडित मुलीने याबाबत १५ ऑक्टोबर रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास 'पटवे' नावाच्या शिक्षकाने तिला ऑफिसमध्ये एकटीलाच जेवण करण्यासाठी बोलावले.
यावेळी जेवण झाल्यानंतर शिक्षक पटवे याने त्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केले. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने पीडित मुलीने याबाबत आश्रमशाळेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी ही गंभीर घटना उघड होऊ नये, यासाठी ती दडपण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही.
advertisement
अखेरीस, पीडित मुलीने धाडस करून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षक पटवे याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आणि अधीक्षकावर माहिती दडवून गुन्ह्यात सहकार्य केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने आश्रमशाळेच्या अधीक्षकाला अटक केली असून, फरार झालेल्या शिक्षकाचा कसून शोध घेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कॅबिनमध्ये एकटीला जेवायला बोलवलं अन्.., शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य, अधीक्षकाला अटक
Next Article
advertisement
Raj Thackeray : बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
  • महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणांची उलथापालथ सुरू आहे.

  • मनसे मुंबईत उद्धव यांची साथ सोडून थेट महायुतीला पाठिंबा देतील अशी चर्चा

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

View All
advertisement