Pune: मॅडमच्या सगळ्या अंगाला रक्त, क्लासमध्येच मुलाचा गळा चिरला, राजगुरुनगरमध्ये काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगरमध्ये सोमवारी सकाळी काही शालेय विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर झाल्याची घटना घडली आहे. इथं एका खासगी ट्यूशनमध्ये एका मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.
सचिन तोडकर, प्रतिनिधी राजगुरुनगर: पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगरमध्ये सोमवारी सकाळी काही शालेय विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर झाल्याची घटना घडली आहे. इथं एका खासगी ट्यूशनमध्ये एका मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांमध्ये जुना वाद होता. याच वादातून एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारदार चाकुने वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता, संबंधित विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
एका खासगी ट्यूशनमध्ये अशाप्रकारे विद्यार्थ्याची हत्या झाल्याने राजगुरूनगर शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हल्लेखोर विद्यार्थी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
हत्येची ही घटना घडल्यानंतर एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने हत्येचा थरार कसा घडला? याची सविस्तर माहिती दिली आहे. प्रत्यक्षदर्शी वैभव मटकर यांनी घटनेची माहिती देताना सांगितलं की, ज्यावेळी मी घरातून बाहेर आलो. तेव्हा क्लाससमोर खूप विद्यार्थी आणि लोक जमले होते. मॅडमच्या संपूर्ण शरीराला रक्त लागलं होतं. हल्ला झालेला मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मानेला आणि पोटावर वार झाले होते."
advertisement
या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने मुलाला दुचाकीने आधी खासगी रुग्णालयात नेलं. पण खासगी रुग्णालयाने त्याला घेतलं नाही. त्यामुळे रुग्णवाहिका बोलवून त्याला सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या दोन मुलांमध्ये आधी भांडणं झाली होती. त्यानंतर याच भांडणातून वार केले. हा हल्ला क्लासमध्ये झाला होता. त्यानंतर मॅडम जखमी विद्यार्थ्याला घेऊन बाहेर आल्या. बाहेर आणल्यानंतर त्याला रुग्णालयात हलवलं, अशी माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 15, 2025 1:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune: मॅडमच्या सगळ्या अंगाला रक्त, क्लासमध्येच मुलाचा गळा चिरला, राजगुरुनगरमध्ये काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार










