SPI Registration 2026: संरक्षण अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! इथं करा अर्ज, वय आणि अटी सगळं एकाच पेजवर

Last Updated:

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील तरूण आणि तरूणींसाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी आणि नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे.

SPI Registration 2026: संरक्षण अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! इथं करा अर्ज, वय आणि अटी सगळं एकाच पेजवर
SPI Registration 2026: संरक्षण अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! इथं करा अर्ज, वय आणि अटी सगळं एकाच पेजवर
संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील तरूण आणि तरूणींसाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी आणि नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. राज्यातील तरूण आणि तरूणींनी मोठ्या प्रमाणावर SPI (Service Preparatory Institute) पदासाठी अर्ज करावे, यासाठी राज्य सरकारने सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. जून 2026 मध्ये सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या 50 व्या तुकडीसाठी आणि नाशिक येथील मुलींच्या तिसऱ्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेसाठी पात्रता
  • तरूण- तरूणी अविवाहित असावेत.
  • महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी अणि कारवार जिल्हयाचे अधिवासी.
  • जन्म तारीख- 02 जानेवारी 2009 ते 01 जानेवारी 2012 च्या दरम्यानची असावे.
  • मार्च एप्रिल मे 2025 मध्ये होणार्‍या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा तरूण किंवा बसणारी तरूणी असावी.
  • जून 2026 मध्ये इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावे.
advertisement
शारिरीक पात्रता
सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावे. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या सर्व शारीरिक निकषांसाठी पात्र असावे. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष पुढीलप्रमाणे, मुलांसाठी उंची कमीत कमी 157 C.M. आणि मुलींसाठी कमीत कमी 152 C.M. वजन 43 Kg, रातांधळेपणा किंवा रंगांधळेपणा नसावा. मुलांसाठी छाती न फुगवता 74 C.M. फुगवून 79 C.M. NDA/ INA प्रवेशासाठी UPSCच्या आधिसूचनेनुसार डोळयांची क्षमता असावी.
advertisement
लेखी परीक्षा आणि मुलाखत
पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून 05 एप्रिल 2026 रोजी विविध केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत 600 मार्काचे बहुपर्यायी Multiple Choice Questions, 75 प्रश्न गणिताचे आणि 75 प्रश्न सामान्य ज्ञान General Ability Test (GAT) असे एकूण 150 प्रश्न असतील. प्रत्येक योग्य उत्तराला (4) गुण आणि चुकीच्या उत्तराला (1) गुण मिळतील. लेखी परीक्षा साधारण इयत्ता 8 वी ते 10 वीच्या स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
advertisement
SPI साठी अर्ज कसा करावा?
मुलांसाठी ऑनलाईन अर्ज www.spiaurangabad.com या संकेत स्थळावर आणि मुलींसाठी ऑनलाईन अर्ज www.girlspinashik.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षा शुल्क रूपये 450/- (परत न करता येण्याजोगे) ऑनलाईन फक्त क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिग इत्यादी द्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलानद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होईल, तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ 28 फेब्रुवारी 2026 संध्याकाळी 11:59 वाजेपर्यत असेल.
advertisement
दिनांक 23 मार्च 2026 नंतर संस्थेच्या संकेत स्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील. परीक्षा संबधित सूचनांसाठी मुलांनी www.spiaurangabad.com व मुलींनी www.girlspinashik.com हे संकेत स्थळ वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही ह्या बाबत सूचना दिल्या जाणार नाहीत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SPI Registration 2026: संरक्षण अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! इथं करा अर्ज, वय आणि अटी सगळं एकाच पेजवर
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement