Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, भूसंपादनास विरोध, 4 शेतकऱ्यांसह पोलीस जखमी

Last Updated:

Shaktipeeth Expressway Farmers Protest : राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता भूसंपादनासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे या महामार्गाला प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. आज धाराशीवमध्ये शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.

'शक्तिपीठ'विरोधात शेतकरी आक्रमक, पोलिसांसोबत झटापट, 4 जण जखमी
'शक्तिपीठ'विरोधात शेतकरी आक्रमक, पोलिसांसोबत झटापट, 4 जण जखमी
धाराशीव/ सांगली: राज्य मंत्रिमंडळाने शक्तिपीठ महामार्गासाठी मंजुरी दिली असून मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता भूसंपादनासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे या महामार्गाला प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. आज धाराशीवमध्ये शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी केली.
धाराशिव खुंटेवाडी परिसरात भूसंपादनावरून तणाव कायम आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी मोठा पोस्ट फाटा घेऊन महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी आज जमिनी संपादित करण्यासाठी दाखल झाले. कालच राज्य शासनाने या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिल्यानंतर व संपादनाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रशासन दाखल झाले. मात्र परिसरातील शेतकऱ्यांनी मोजनी करणाऱ्याला अधिकाऱ्यांना विरोध केल्यामुळे शेतकरी पोलिसात वाद झाला. या वादात पोलीस आणि शेतकर्‍यांमध्ये झटापट झाली. या झटापटीत शेतकरी 4 शेतकरी जखमी झाले आहेत. तर, काही पोलिसही जखमी झाले आहेत. महसूल विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित आहेत. शेतकरी मात्र जीव गेला तरी भूसंपादन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला.
advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी...

शक्तिपीठ महामार्गाचा वाद पेटल्यानंतर शेतकरी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमले. शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या झटापटीनंतर या महामार्गाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या झटापटीविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी घोषणाबाजी केली. कोणत्याही परिस्थितीत जमिनीची मोजणी होऊ देणार नसून पोलीस आणि अधिकाऱ्यांनी शेतातून निघून जावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
advertisement

सांगलीत अधिकाऱ्यांचा मार्ग रोखला...

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगलीच्या आटपाडीतील शेटफळे येथे शेतकऱ्यांनी रोखून धरले. संतप्त शेतकऱ्यांकडून भूसंपादनाच्या मोजणी प्रक्रियेला जोरदार विरोध करण्यात आला कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही,अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सकाळ पासून थांबून राहावे लागले आहे.
advertisement
राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी देत निधीची तरतूद करण्यात आलेली आहे,यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनासाठी सांगलीमध्ये प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र आटपाडीतल्या शेटफळे या ठिकाणी पोलीस फौजफाटा घेऊन पोहोचलेल्या भूसंपादन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, भूसंपादनास विरोध, 4 शेतकऱ्यांसह पोलीस जखमी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement