advertisement

भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की, शंभूराज देसाईंच्या हाताला जखम, म्हणाले, रक्त पडल्यावरच मला....

Last Updated:

Satara ZP: बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ नसतानाही योग्य व्यूहरचना आखून भारतीय जनता पक्षाने साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपद मिळवले.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक
सचिन जाधव, प्रतिनिधी, सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाला गालबोट लागले असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केसला. यावेळी पालकमंत्री देसाई यांच्या डाव्या हाताला जखम झाली.
बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ नसतानाही योग्य व्यूहरचना आखून भारतीय जनता पक्षाने अध्यक्ष-उपाध्यक्षपद मिळवले. भाजपच्या प्रिया शिंदे या अध्यक्षपदी निवडून आल्या तर राजू भोसले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र, या निवडीच्या कार्यक्रमाला सेना-भाजपच्या संघर्षाचे गालबोट लागले.

रक्त पडू लागल्यावर मला लागल्याचं कळालं

पालकमंत्री देसाई यांना धक्काबुक्की झाल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून याचे पडसाद तीव्र स्वरूपात उमटतील, असा इशारा मंत्री देसाई यांनी दिला. या घटनेचा निषेध व्यक्त करीत झालेला प्रकार दुर्दैवी असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले. गर्दीत मला कसे लागले हे मला माहिती नाही. जेव्हा रक्त पडू लागले तेव्हा मला समजले, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.
advertisement

भाजपने यंत्रणेला हाताशी धरून सत्तेचा गैरवापर केला

पोलीस बळाचा वापर करून खोटे गुन्हे दाखल केला जात असल्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले. सदस्यांच्या आणि मंत्र्यांच्या अंगावर पोलीस येत असतील तर ती गंभीर बाब आहे असेही मंत्री मकरंद पाटील म्हणाले. दुसरीकडे मतदानाचा अधिकार असताना देखील पोलिसांनी हाताला धरून बाहेर काढले. आम्ही रस्त्यावरील लढाई लढू, भाजपने प्रशासनाला हाताला धरून यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.
advertisement

तो पोलिसांचा विषय, आम्हाला माहित नाही

दरम्यान या प्रकरणावर भाजप नेते मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना विचारले असता, पोलीस कारवाईशी आमचा काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले. कुणाच्या तरी तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई केली असेल, तो त्यांच्या अधिकारांचा विषय आहे, असे सांगत शिवेंद्रराजे यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की, शंभूराज देसाईंच्या हाताला जखम, म्हणाले, रक्त पडल्यावरच मला....
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement