Sharad Pawar: 'एवढ्या लवकर मला वर घालवताय काय रं...', शरद पवारांच्या गुगलीने कोल्हापुरात हास्यकल्लोळ

Last Updated:

Sharad Pawar : शरद पवारांच्या मिश्किल उत्तरानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

News18
News18
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मिश्किलपण काही नवा नाही,आज पुन्हा याचा प्रत्यय कोल्हपूरमध्ये आला आहे. शरद पवार हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. तब्बल चार तासांचा प्रवास करून ते कोल्हापूरमध्ये पोहोचले. दीर्घ प्रवासानंतरही त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि मिश्किलपणा कायम असल्याचे पहिले मिळाले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर काही वेळासाठी ते बाजूच्या हॉलमध्ये थांबले होते. यावेळी विविध माध्यमांचे प्रतिनिधी तिथे पोहचले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आणि आर. के. पवार यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना, 'साहेब आता वर चालले आहेत. आज पत्रकार परिषद होणार नाही, असे सांगितले.
यावर तत्काळ प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी आपल्या खास मिश्किल शैलीत आर. के. पवार यांच्याकडे पाहत विचारले, “आता तुम्ही काय बोललात? एवढ्या लवकर कुठे वर घालवताय?” त्यांच्या या मिश्किल उत्तरानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. थकलेल्या प्रवासानंतरही पवारांच्या मिश्किलपणामुळे सभागृहातील गंभीर वातावरण बदलले.

शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर

शरद पवारांचा हा दोन दिवसांचा दौरा राजकीय दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात ते पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते मार्गदर्शन करणार आहेत. पवार यांची कार्यपद्धती, त्यांचा विनोदी स्वभाव आणि काटेकोर शिस्त यामुळे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना नेहमीच प्रेरणा मिळते.
advertisement

आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्त्वाचा

बुधवारी झालेल्या या छोट्याशा प्रसंगातून पुन्हा एकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सहजता आणि हलक्याफुलक्या वातावरणात शरद पवारांच्या विनोदी शैलीचा अनुभव आला आहे. पवार यांची प्रतिक्रिया ऐकून सर्वांना क्षणभर प्रवासाचा थकवा विसरला आणि उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान आणखी अनेक राजकीय घडामोडींवर चर्चा होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे.
advertisement

शरद पवारांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंची झलक 

शरद पवारांचा कोल्हापूर दौरा फक्त राजकीयच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंची झलक दाखवणारा ठरला आहे. त्यांच्या या मिश्किल प्रश्नाच्या उत्तराने दौऱ्याची सुरुवातच रंगतदार झाली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar: 'एवढ्या लवकर मला वर घालवताय काय रं...', शरद पवारांच्या गुगलीने कोल्हापुरात हास्यकल्लोळ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement