Hives : अंगावर पित्त उठलं तर काय करायचं ? आयुर्वेदातल्या उपायांचा होईल उपयोग

Last Updated:

अंगावर उठणाऱ्या त्वचेच्या गाठी हलक्यात घेऊ नका. कारण शरीराकडून येणारे हे संकेत महत्त्वाचे आहेत. शरीरात काहीतरी असंतुलित आहे. थोडी काळजी, योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल केले तर ही समस्या लवकर सुटू शकते.

News18
News18
मुंबई : शरीरावर अचानक लाल पुरळ उठणं, तीव्र खाज येणं आणि जळजळ होणं हे खूप त्रासदायक असतं. अनेकदा यामागे पित्त हे कारण असतं. काहींना कमी प्रमाणात तर काहींना पित्ताच्या गाठी उठतात.
मुलांपासून प्रौढांपर्यंत कोणत्याही वयात हा त्रास जाणवू शकतो. कामावर, प्रवासात किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान अचानक पित्त उठलं तर परिस्थिती अवघड होते.
अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी येण्याची अनेक कारणं असू शकतात. काही औषधं, अन्न, धूळ, प्रदूषण किंवा रसायनांपासून होणारी ऍलर्जी. हवामान बदलल्यावर काहींना ही समस्या जास्त जाणवते. पचनाच्या समस्यांमुळे  पित्त होऊ शकतं. या व्यतिरिक्त, ताणतणाव आणि झोपेच्या अभावामुळे शरीराचं संतुलन बिघडू शकतं. यामुळे अंगावर पित्ताच्या गाठी उठू शकतात.
advertisement
ताबडतोब काय करता येतील ?
अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी येत असतील तर प्रथम खाजवणं टाळा, अन्यथा पुरळ वाढू शकतं.
कोल्ड कॉम्प्रेस म्हणजेच आईस बॅग लावल्यानं आराम मिळू शकतो.
शरीरावर कडुनिंबाची किंवा तुळशीची पानं कुस्करून देखील लावू शकता. यामुळे खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.
advertisement
याशिवाय, आहाराकडे विशेष लक्ष द्या. हलकं, सहज पचणारं पदार्थ जसं की दलिया आणि फळं खा. तसंच, काकडी आणि नारळ पाणी यासारख्या पदार्थांनीही थंडावा मिळेल.
अंगावर पित्ताच्या गाठी वारंवार उठत असतील किंवा श्वास घेण्यास त्रास होणं, चेहऱ्यावर सूज येणं आणि चक्कर येणं अशी लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण हे गंभीर ऍलर्जीचं लक्षण असू शकतं. अंगावर उठणाऱ्या त्वचेच्या गाठी हलक्यात घेऊ नका. कारण शरीराकडून येणारे हे संकेत महत्त्वाचे आहेत. शरीरात काहीतरी असंतुलित आहे. थोडी काळजी, योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल केले तर ही समस्या लवकर सुटू शकते.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hives : अंगावर पित्त उठलं तर काय करायचं ? आयुर्वेदातल्या उपायांचा होईल उपयोग
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement