advertisement

शरद पवार राज्यसभेवर, काँग्रेसचं ठरलं पण दिल्लवारीत ठाकरेंचा खोडा? सस्पेन्स कायम

Last Updated:

शरद पवारांना दिल्लीला पाठवायचे याबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते यासाठी एकमेकांची भेट घेताना पाहायला मिळत आहे.

News18
News18
मुंबई :   राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली असून याच महिन्यातील 16 तारखेला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी ही निवडणूक होत असून महायुतीकडे 6 आणि महाविकास आघाडीकडे 1 जागा आहे. त्यामध्ये, भाजपला 4 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळणार आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव निश्चित झालं आहे. तर एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. सध्या या एका जागेवरून शरद पवारांना दिल्लीला पाठवायचे याबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते यासाठी एकमेकांची भेट घेताना पहायला मिळत आहे.
शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात यावे यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. या भेटीनंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती दिली होती. दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचा राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवार यांच्या नावाला पाठींबा असल्याची माहिती काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
advertisement

ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट नाही

दरम्यान मागील दोन आठवड्यापासून महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या एका जागेवरून मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. त्यातच, आता शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या नावावर महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले पाहायला मिळत नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा शरद पवारांना पाठिंबा आहे. मात्र अद्याप ठाकरेंच्या शिवसेनेने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.
advertisement

काँग्रेस हायकमांडचा आदेश

राज्यसभेसाठी शरद पवारांनी पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केल्याने या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंसह दिल्लीमधील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या हायकमांडने शरद पवारांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले? 

advertisement
विजय वडेट्टीवार म्हणाले, आम्ही राज्यसभेची जागा आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे दावा केला होता. पण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी दिल्लीशी संपर्क केला आणि उद्धव ठाकरेंशी संपर्क केला. यामध्ये शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे. आमच्या हायकामंडने पवार साहेबांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.. आता आम्हाला फोन आला की मल्लिकार्जुन खर्गे यांनी पवार साहेबांना पाठींबा देऊन पाठवलं पाहिजे असं ठरलं आहे. मात्र   तीन पक्षाच्या आघाडीमध्ये जे काही ठरेल, ते अंतिम होईल. जोपर्यंत तिन्ही पक्ष मिळून जोपर्यंत पुढे जात नाही, ,तोपर्यंत यावरचा हा अंतीम निर्णय असल्याचे कारण नाही.
advertisement

राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक

राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. तामिळनाडूतून 6, बिहार आणि पश्चिम बंगालमधून 5 आणि ओडिशा राज्यातून 4, आसामधून 3, तेलंगाणातून 2 आणि छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवार राज्यसभेवर, काँग्रेसचं ठरलं पण दिल्लवारीत ठाकरेंचा खोडा? सस्पेन्स कायम
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement