पार्थ पवारांसोबत व्यवहार, शीतल तेजवाणीचा आणखी एक कांड, बँकेला 10 वेळा लावला चुना

Last Updated:

Crime in Pune: कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांशी व्यवहार करणाऱ्या शीतल तेजवाणीचा आणखी एक कांड उघडकीस आला आहे.

News18
News18
पुण्यातील कोरेगाव परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवाणींचा समावेश आहे. शीतल तेजवाणी यांनीच महार वतनाच्या सरकारी जमिनी लाटून पार्थ पवारांच्या कंपनीला विकल्याचा आरोप आहे.
आता शीतल तेजवाणीचा आणखी एक कांड समोर आला आहे. त्यांनी आपला पती सागर सूर्यवंशीसोबत मिळून पिंपरी चिंचवडमधील द सेवा विकास बँकेंला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल दहा कर्ज उचलली आहे. यातून मिळालेली ४१ कोटींची रक्कम त्यांनी इतरत्र गुंतवल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
सेवा विकास बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी सागर सूर्यवंशीला काही दिवसांपूर्वी सीआयडी, पिंपरी चिंचवड पोलीस आणि ईडीकडून अटक झाली होती. तर शीतल अटकपूर्व जामीन मिळवण्यात यशस्वी झाली होती. त्यामुळे केवळ कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणातच नव्हे तर बँकेच्या बनावट कर्ज प्रकरणातही शीतल तेजवाणी मुख्य आरोपी असल्याचं आता समोर आलं आहे.
advertisement
आरोपी शीतल तेजवाणी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी यांनी द सेवा विकास बँकेच्या विविध शांखांमधून दहा बनावट कर्ज घेतली होती. हे कर्ज विविध कारणांसाठी घेतली होती. मात्र प्रत्यक्षात खर्च न करता इतर कारणांसाठी पैशांचा वापर केला. हे पैसे इतरत्र गुंतवले. दोन आलिशान वाहनांसाठी, लॉनच्या व्यवसायासाठी त्यांनी कर्ज घेतलं होतं. मात्र त्यांनी प्रत्यक्षात एकच आलिशान कार घेतली. २०१९ साली 'द सेवा विकास बँकेनं एकूण १२४ बनावट कर्ज देऊन ४३० कोटींचा अपहार केला होता. यात शीतल तेजवाणी आणि सागर सूर्यवंशी यांचा सहभाग होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पार्थ पवारांसोबत व्यवहार, शीतल तेजवाणीचा आणखी एक कांड, बँकेला 10 वेळा लावला चुना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement