Shivrajyabhishek Din: तलवार, भाला सोडा, शत्रूला घाम फोडणारी ही शिवकालीन शस्त्रं तुम्ही पाहिली का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Shivrajyabhishek Din: शिवकालीन शस्त्र म्हटलं की आपल्याला तलवार आणि भाला एवढ्याच गोष्टी माहित असतात. मात्र युद्ध क्षेत्रावर अनेक शस्त्रे वापरात होती. याच शस्त्रांबाबत जाणून घेऊ.
जालना: छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन 6 जून हा संपूर्ण राज्यात शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वराज्यावर चालून आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी शिवकाळात अनेक शस्त्रे वापरली जात होती. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेले वाघनख, बिचवा, शिवकाळात सर्वाधिक वापरले जाणारे तीर कमान, चिलखत आणि इतर शस्त्रांचा संग्रह बदलापूर येथील इतिहास संशोधक सुनील कदम यांनी केला आहे. आज शिवराज्याभिषेक दिनी याच शस्त्रांबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
शिवकालीन शस्त्र म्हटलं की आपल्याला तलवार आणि भाला एवढ्याच गोष्टी माहित असतात. मात्र युद्ध क्षेत्रावर अनेक शस्त्रे वापरात होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरण्यात आलेली सर्व प्रकारची शस्त्रे त्यांच्या संग्रही पाहायला मिळतात. त्यांच्याकडे शिवकाळातील विविध प्रकारच्या तलवारी असून सरळ पात्याची मराठा तलवार देखील त्यांच्याकडे आहे. याव्यतिरिक्त सुसर पत्ता, कत्ती, गोलाई, किरज ही अनेक प्रकारची शस्त्रे इथे उपलब्ध आहेत. सुमारे 40 प्रकारच्या तलवारी आणि त्यांच्या मुठी त्यांच्या संग्रही पाहायला मिळतील.
advertisement
गोफण, तीरकमान, गदा..
कदम यांच्याकडे तलवारीबरोबरच विविध प्रकारचे भाले पाहायला मिळतील. त्याचबरोबर युद्धामधील आणखी एक महत्त्वाचे शस्त्र म्हणजे गदा होय. शिवकाळामध्ये या गदांना गुरगुज असं म्हटलं जायचं. त्याचबरोबर नैसर्गिक गोष्टींपासून देखील काही शस्त्रे बनवली जायची. त्यापैकीच एक म्हणजे हरणाच्या शिंगापासून बनवलेलं म्हाडू नावाचे शस्त्र होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व युद्धांमध्ये जी दोन शस्त्रे वापरण्यात आली ती म्हणजे गोफण आणि तीरकमान देखील त्यांच्या संग्रही आहे.
advertisement
शस्त्रांनाही वेगळी नावं
लहान शस्त्रांमध्ये कट्यार, तसेच विविध प्रकारचे दांडपट्टे त्यांच्या संग्रहात आहेत. शिवाजी महाराजांच्या दांडपट्ट्याचे नाव ही यशवंत असं होतं. शिवाजी महाराजांकडे देखील एक गुरज होते त्याचे नाव शंभू प्रसाद असं होतं, असं कदम सांगतात.
शिवकालीन वाघनख
छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेलं महत्त्वाचं शस्त्र म्हणजे वाघनख. ही वाघनखं पूर्वी लंडनला होती, ती सध्या नागपूर येथे पाहायला मिळतील. तशाच पद्धतीची वाघनखं कदम यांच्याकडे पाहायला मिळतील. त्याचबरोबर विंचवाच्या आकाराप्रमाणे असणारा बिचवा नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. शिवाजी महाराजांनी वापरलेल्या शस्त्रांची माहिती प्रत्येकाला असायलाच हवी. त्यासाठीच हा संग्रह केल्याचं इतिहास अभ्यासक कदम सांगतात.
advertisement
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
June 06, 2025 12:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shivrajyabhishek Din: तलवार, भाला सोडा, शत्रूला घाम फोडणारी ही शिवकालीन शस्त्रं तुम्ही पाहिली का?