'वेळ प्रत्येकाची येते, उद्या माझी येईल..'; सांगलीतील पराभवाचं कारण सांगत चंद्रहार पाटलांची पोस्ट
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
आता चंद्रहार पाटील यांनीही या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रहार पाटील यांनी शेअर केलेली पोस्ट आता व्हायरल झाली आहे.
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी शेवटपर्यंत नाराजी नाट्य पाहायला मिळालं. उमेदवारी जाहीर करण्यापासून ते निवडणुकीच्या निकालापर्यंत महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून बराच वाद झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली.
यात स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विशाल पाटील यांना छुपी मदत केल्यानं उद्धव ठाकरे यांची काँग्रेसवर नाराजी वाढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. तर, दुसरीकडे आता चंद्रहार पाटील यांनीही या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रहार पाटील यांनी शेअर केलेली पोस्ट आता व्हायरल झाली आहे.
advertisement
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, की 'या निवडणुकीत कोणाला दिलदार शत्रू मिळाले तर कोणाला दिलदार मित्र मिळाले. पण माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करण्यासाठी सर्वच सहकारी मित्र, एकत्र आले आणि शत्रू म्हणून समोर उभे राहिले. पण वेळ प्रत्येकाची येते. आज तुमची आहे, उद्या माझी येईल..,' असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे संतापले
निकालानंतर काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला असून सांगलीचे नवनिर्वाचित अपक्ष खासदार विशाल पाटील हे नाना पटोले यांची भेट घेणार आहेत. दोघेही आज मुंबईत भेटणार आहेत. या बैठकीनंतर विशाल पाटील हे सहयोगी खासदार म्हणून काँग्रेसमध्ये येऊ शकतात. सांगलीत बंडखोरी केली तरी काँग्रेसने विशाल पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाहीय. दुसऱ्या बाजूला सांगलीच्या जागेवर विशाल पाटील यांना काँग्रेसने मदत केल्याने उद्धव ठाकरे संतापले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 06, 2024 1:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'वेळ प्रत्येकाची येते, उद्या माझी येईल..'; सांगलीतील पराभवाचं कारण सांगत चंद्रहार पाटलांची पोस्ट