advertisement

"आज दादा असायला हवे होते...", शोभाकाकींच्या विजयाने बोरवडेकरांचे डोळे पाणावले, अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची पहिली मोठी गरुडझेप

Last Updated:

Kolhapur Zilla Parishad Election Result : बिद्री–बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून शोभाकाकी गणपतराव फराकटे यांच्या विजयानं अजितदादांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. हा विजय म्हणजे जनतेनं दिलेली कौलाची पावती आणि स्वर्गीय अजितदादा पवार व गणपतराव फराकटे यांना अर्पण केलेली भावनिक श्रद्धांजली ठरली आहे.

News18
News18
कोल्हापूर: बोरवडेचे सुपुत्र दिवंगत गणपतराव फराकटे यांच्या सामाजिक कार्याला आज खरी श्रद्धांजली मिळाली. बिद्री–बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून शोभाकाकी गणपतराव फराकटे यांनी दणदणीत विजय मिळवत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या विजयामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून, फराकटे कुटुंबाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
दिवंगत गणपतराव फराकटे यांनी बिद्री–बोरवडे परिसरातील जनतेला कुटुंब मानून आयुष्यभर काम केले. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या गणपतरावांच्या कार्याची हीच पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे. शोभाकाकींचा विजय हा स्वर्गीय अजितदादा पवार आणि स्वर्गीय गणपतराव फराकटे यांना खरी श्रद्धांजली ठरली आहे, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
advertisement
शोभाकाकी गणपतराव फराकटे यांच्या विजयानंतर बोरवडे व परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, हा विजय विकासकामांना नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचे ऑगस्ट 2024 मध्ये अचानक निधन झाले होते. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पत्राने शोभाकाकी फराकटे यांना उमेदवारी दिली होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे स्वर्गीय अजितदादा पवार आणि स्वर्गीय गणपतराव फराकटे यांना खरी श्रद्धांजली अशी भावना व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"आज दादा असायला हवे होते...", शोभाकाकींच्या विजयाने बोरवडेकरांचे डोळे पाणावले, अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची पहिली मोठी गरुडझेप
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement