मासेप्रेमींच्या ताटातून मोठी मच्छी गायब, दरवाढीचा पर्यटकांना फटका
- Published by:Devika Shinde
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
सध्या, मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे, त्यामुळे बाजारात मच्छी येऊ लागली आहे, पण ती मर्यादित प्रमाणात.
सितराज परब-प्रतिनिधी, सिंधूदूर्ग : दिवाळी सुटीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. स्वच्छ आणि सुंदर किनारपट्टी असलेल्या सिंधुदुर्गात पर्यटक सागर किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी आणि ताज्या मच्छीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. सिंधुदुर्गात १ ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला प्रारंभ झाला होता, परंतु ऑक्टोबरपर्यंत समुद्रात वादळासारखी स्थिती असल्याने मासेमारीला अपेक्षित गती मिळाली नव्हती. सध्या, मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे, त्यामुळे बाजारात मच्छी येऊ लागली आहे, पण ती मर्यादित प्रमाणात.
सध्या मासेमारीच्या जाळ्यात लहान मासे येत असल्याने बाजारात मोठ्या माशांचे दर वाढलेले आहेत. पापलेट १५०० रुपये किलो, सुरमई ८०० रुपये किलो, फ्रॉन्स ७०० रुपये किलो, तर मुशी १५०० रुपये किलो असे दर आहेत. त्यामुळे मच्छी खवय्यांची चांगलीच हिरमोड होत आहे. वाढत्या दरांविषयी खवय्ये सांगतात की, हजार पंधराशे रुपयांची मच्छी खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडत नाही. कमाई मर्यादित असल्यानं कमी बजेटमध्ये लहान मच्छीवरच समाधान मानावं लागत आहे.
advertisement
एकूणच, समुद्रात उपलब्ध मच्छीच्या प्रमाणानुसार दर ठरवले जातात, त्यामुळे सध्या मोठ्या माशांची कमी असल्याने हे दर वाढलेले आहेत. मात्र काही दिवसांत हे दर सामान्य स्तरावर येतील, अशी आशा मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
एकूणच चित्र पाहिलं तर हे दर समुद्रातील मच्छीमारीवर अवलंबून असतात. समुद्रात ज्याप्रमाणे मच्छी मिळते त्याप्रमाणे हे दर ठरवले जातात. त्यामुळेच सध्या तरी मच्छी खवय्यांची हिरमोड झालेली पाहायला मिळत आहे. हे दर काही दिवसात सर्वसामान्यांना परवडतील अशा भावात येतील असे मच्छीमार यांचे म्हणणे आहे. मोठी मच्छी जाळ्यात कमी मिळत असल्याने हे दर वाढल्याचे मच्छीमार सांगत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2024 5:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सिंधुदुर्ग/
मासेप्रेमींच्या ताटातून मोठी मच्छी गायब, दरवाढीचा पर्यटकांना फटका

