सोलापूर महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर! कुणाच्या गळ्यात पडणार माळ?

Last Updated:

solapur Election 2026 : राज्याच्या २९ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली आहे. यामध्ये सोलापूर महापालिकेचाही समावेश आहे.

Solapur Election 2026
Solapur Election 2026
सोलापूर : राज्याच्या २९ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली आहे. यामध्ये सोलापूर महापालिकेचाही समावेश आहे. आरक्षण सोडतीनुसार ओबीसीचा महापौर होणार आहे.
भाजपचा मोठा विजय
महानगरपालिकेच्या निकालांनी  संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. सोलापूरकरांनी यंदा कोणा एका पक्षाला कौल दिला नसून, भाजपच्या बाजूने अक्षरशः विजयाची लाट निर्माण केली आहे. १०२ जागांच्या या सभागृहात भाजपने तब्बल ८७ जागा जिंकून ऐतिहासिक आणि 'एकतर्फी' विजय नोंदवला आहे.
'७५ प्लस'चा नारा ठरला फिका, भाजपने ओलांडला ८५ चा टप्पा
निवडणुकीपूर्वी भाजपने ७५ हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, निकालांनंतर भाजपची ही घोडदौड ८७ जागांपर्यंत पोहोचली आहे. २०१७ मध्ये भाजपकडे ४९ नगरसेवक होते, मात्र यंदा ही सदस्य संख्या थेट ३८ ने वाढली आहे. केंद्रातील आणि राज्यातील सत्तेचा मोठा फायदा या स्थानिक निवडणुकीत भाजपला मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
advertisement
आमदार आणि पालकमंत्र्यांची रणनीती यशस्वी
सोलापूरमधील चार आमदार आणि पालकमंत्र्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून जी मोर्चेबांधणी केली होती, तिला मोठे यश आले आहे. विरोधी पक्षातील (काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना) अनेक विद्यमान नगरसेवकांना आपल्याकडे खेचून त्यांना उमेदवारी देण्याची भाजपची रणनीती यशस्वी ठरली. जिथे भाजपला सर्व १०२ जागांवर उमेदवार मिळाले, तिथे विरोधकांना साधे उमेदवार शोधण्यासाठीही मोठी कसरत करावी लागली.
advertisement
विरोधी पक्षांची ऐतिहासिक पिछेहाट
एकेकाळी सोलापूरचा गड राखणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. काँग्रेसला केवळ २, तर राष्ट्रवादीला फक्त १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेने ४ जागा जिंकल्या असल्या, तरी 'एमआयएम' ८ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
दरम्यान, भाजपच्या या दणदणीत विजयामुळे सोलापूर महापालिकेत आता कोणताही प्रबळ विरोधक उरलेला नाही. या निकालाने हे सिद्ध केले आहे की, विकासाचा अजेंडा आणि योग्य राजकीय रणनीती यांच्या जोरावर भाजपने सोलापूरमध्ये एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापूर महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर! कुणाच्या गळ्यात पडणार माळ?
Next Article
advertisement
Mayor Reservation Lottery List: ठाण्यात SC तर कल्याण डोंबिवलीत ST, मुंबई-पुण्यात महापौर कुणाचा?
Mayor Reservation: ठाण्यात SC तर कल्याण डोंबिवलीत ST, मुंबई-पुण्यात काय स्थिती?
  • २९ महापालिकांच्या महापौरपदासाठीची बहुप्रतीक्षित आरक्षण सोडत आज मंत्रालयात पार

  • या सोडतीने अनेक प्रस्थापित नेत्यांचे राजकीय गणित बिघडवले

  • नवीन चेहऱ्यांसाठी सत्तेची कवाडे उघडली आहेत.

View All
advertisement