पुण्यात 4 वर्षाच्या मुलीला सतत खोकला; पोटात 'ती' वस्तू, आतडे फाटलेले.., एक्स-रे बघताच डॉक्टरही चक्रावले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
एका चार वर्षीय मुलीला गेल्या काही दिवसांपासून सतत खोकला येत असल्याने पालकांनी तिला रुग्णालयात आणलं. सुरुवातीला एक्सरे तपासणीत तिच्या पोटात काहीतरी बाह्य वस्तू असल्याचं आढळलं
पुणे : पुणे येथील नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. यात एका चार वर्षीय मुलीला गेल्या काही दिवसांपासून सतत खोकला येत असल्याने पालकांनी तिला रुग्णालयात आणलं. सुरुवातीला एक्सरे तपासणीत तिच्या पोटात काहीतरी बाह्य वस्तू असल्याचं आढळलं. ती वस्तू नेमकी काय आहे हे पालकांनाही ठाऊक नव्हतं. सीटी स्कॅन आणि एंडोस्कोपी दरम्यान डॉक्टरांना धक्कादायक वास्तव समजलं. मुलीने खेळता खेळता एक चुंबकीय ब्रेसलेट गिळलं होतं.
पोटविकारतज्ञ डॉ. प्रमोद कटारे आणि बालरोगतज्ञ डॉ. प्रणव जाधव यांनी या केसचे गांभीर्य ओळखले. हे ब्रेसलेट चुंबकीय असल्याने त्याचे काही भाग जठारात तर काही भाग आतड्याच्या टोकाला एकमेकांना चिकटले होते. यामुळे पोटात तीन ठिकाणी छिद्रे पडली होती. ब्रेसलेट एका महत्त्वाच्या रक्तवाहिनीच्या मागे असल्याने एंडोस्कोपी करणे शक्य नव्हते. अखेर, दोन तास चाललेल्या 'लॅपरोटोमी' या खुल्या शस्त्रक्रियेद्वारे ब्रेसलेट बाहेर काढण्यात आले आणि आतड्यांच्या जखमा शिवल्या गेल्या.
advertisement
नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरम डॉक्टरांनी ४ वर्षीय चिमुरडीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटात अडकलेले 'चुंबकीय ब्रेसलेट' बाहेर काढले आहे. या ब्रेसलेटमुळे मुलीच्या पोटात आणि आतड्यांना गंभीर छिद्रे पडली होती, मात्र वेळेत उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला आहे.
advertisement
डॉक्टरांचा पालकांना सल्ला: जर उपचाराला विलंब झाला असता, तर अन्नाचा अंश पोटात पसरून संसर्ग होऊन मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी आवाहन केले आहे की, ६ वर्षांपर्यंतची मुले कोणतीही वस्तू तोंडात घालतात. त्यामुळे नाणी, चुंबकीय ब्रेसलेट किंवा लहान खेळणी मुलांपासून लांब ठेवावीत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 12:17 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात 4 वर्षाच्या मुलीला सतत खोकला; पोटात 'ती' वस्तू, आतडे फाटलेले.., एक्स-रे बघताच डॉक्टरही चक्रावले









