इंडस्ट्रीचा तगडा खलनायक हरपला, वयाच्या 54 व्या वर्षी हार्ट फेल्युअरने निधन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध खलनायकाचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याचं वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी अभिनेत्याचा मृत्यू झालाय. त्याच्या निधनाची माहिती समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे कुटुंबीय देखील मोठ्या धक्क्यात आहेत. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी अभिनेत्याला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
हा अभिनेता इंडस्ट्रीत खलनायक भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध होता. इंडस्ट्रीचा एक तगडा खलनायक म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याने आतापर्यंत अनेक अजरामवर कलाकृतींमध्ये काम केलं आहे. त्याची मोठी फॅन फॉलोविंग आहे. पण त्याच्या अकाली जाण्याने सगळेच हादरले आहेत.
advertisement
मलयाळम फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी आणि दिवंगत अभिनेत्री कल्पना यांचा भाऊ अभिनेता कमल रॉय यांचं निधन झालं आहे. 54 व्या वर्षी चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कमल रॉय यांचा मृत्यू हार्ट फेल्युअरमुळे झाला आहे. गेल्या काही काळापासून ते चित्रपटसृष्टीत फारसे सक्रिय नव्हते. त्यांच्या अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. विशेषतः गंभीर आणि नकारात्मक भूमिका साकारून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच मलयालम इंडस्ट्रीत त्यांची ओळख प्रामुख्याने एक ताकदवान खलनायक म्हणून होती.
advertisement
कमल रॉय प्रसिद्ध नाट्यकलाकार चावरा व्ही. पी. नायर आणि विजयलक्ष्मी यांचा मुलगा. अभिनयाचं बाळकडू त्यांच्या कुटुंबाकडूनच मिळालं. कुटुंबातील पाच भावंडांपैकी चार जणांनी अभिनय क्षेत्रात नाव कमावलं. त्यांच्या बहिणी उर्वशी, कल्पना आणि कलरंजिनी या मलयालम सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री राहिल्या, तर भाऊ प्रिन्स हेही अभिनेता होते. विशेष म्हणजे त्यांचे आजोबा सूरनाड कुंजन पिल्लई हे प्रसिद्ध कोश-लेखक, इतिहासकार, कवी आणि टीकाकार होते.
advertisement
छोट्या पडद्यावरही कमल रॉय यांनी आपली छाप सोडली होती. 'शारदा' सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. कमल रॉय यांच्या निधनाने मलयाळम इंडस्ट्रीने एक तगडा खलनायक गमावला आहे. त्यांच्या अभिनयामुळे ते कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 12:04 PM IST










