सकाळी मुलींना घास भरवला, दुपारी बाळासाहेब रक्ताच्या थारोळ्यात, बाबांना पाहून चिमुकल्यांनी फोडला हंबरडा!

Last Updated:

Solapur MNS Leader Balasaheb Sarvade News: शुक्रवारी सकाळी बाळासाहेब सरवदे यांनी आपल्या दोन्ही मुलींना स्वत:च्या हाताने भरवलं होतं. दुपारी त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह बघून दोन्ही चिमुकल्या मुलींनी हंबरडा फोडला.

Solapur MNS Balasaheb Sarwade Murder Case
Solapur MNS Balasaheb Sarwade Murder Case
सोलापूरात शुक्रवारी दुपारी हत्येची धक्कादायक घटना घडली. राजकीय वादातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या केली. सोलापूरातील प्रभाग क्रमांक दोन मधून बाळासाहेब सरवदे यांच्या वहिनी रेखा सरवदे इच्छुक होत्या. त्यांनी भाजपकडे तिकीटही मागितलं होतं. पण पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं. यानंतर रेखा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा यांची उमेदवारी कायम राहावी, यासाठी बाळासाहेब सरवदे प्रयत्न करत होते. मात्र येथील उमेदवार शालन शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर रेखा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
पण अर्ज मागे घेऊनही शंकर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी अपमानास्पद स्टेटस ठेवलं. तसेच वाद उकरून काढला. याच वादातून बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येपर्यंत असं काही होईल, याची कुणालाच कल्पना नव्हती. शुक्रवारी सकाळी त्यांनी नेहमी प्रमाणे आपल्या दोन्ही मुलींना स्वत:च्या हाताने भरवलं होतं. यानंतर ते घरातून बाहेर पडले. मात्र दुपारी रक्ताने माखलेला मृतदेह बघून दोन्ही चिमुकल्या मुलींनी हंबरडा फोडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
advertisement

नेमकं काय घडलं?

जोशी गल्लीत झालेल्या हत्याकांडातील मृत बाळासाहेब सरवदे यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी आराध्या इयत्ता पहिलीत शिकत आहे, तर दुसरी लहान मुलगी त्रिशा ही साडेतीन वर्षांची आहे. हत्या होण्यापूर्वी सकाळी बाळासाहेबांनी आपल्या लाडक्या मुलींना स्वतःच्या हाताने घास भरवला होता. त्यांच्यासोबत काही वेळ घालवल्यानंतर ते घराबाहेर पडले. मात्र, दुपारी अचानक आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहताच आराध्या अन् त्रिशाने एकच हंबरडा फोडला. ही दुर्दैवी घटना पाहणाऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर झाले.
advertisement
मृत बाळासाहेब सरवदे यांची पत्नी वंदना यांचेही अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. त्या जोरजोरात रडत असल्यामुळे त्यांच्या दोन्ही मुली प्रचंड घाबरलेल्या. दोन्ही मुली आपल्या आजीसोबत होत्या, तर नातेवाईक वंदना यांना धीर देताना दिसले. जोशी गल्लीतील बोरामणी नाक्याजवळील श्री इंद्र भवानी देवी मंदिराजवळ बाळासाहेब सरवदे यांचे घर आहे. घरासमोर सर्व नातेवाईक जमलेले होते. परिसरात प्रचंड शोकाकुल वातावरण पसरले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सकाळी मुलींना घास भरवला, दुपारी बाळासाहेब रक्ताच्या थारोळ्यात, बाबांना पाहून चिमुकल्यांनी फोडला हंबरडा!
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement