Oscar मध्ये रंगणार 'दशावतार'चा खेळ! 150 चित्रपटांना मागे टाकून बाबुली मेस्त्रीची मोठी झेप
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कोकणातल्या बाबुली मेस्त्रीनं मोठी झेप घेतली आहे. मराठी सिनेमाची मान उंचावणारा 'दशावतार' हा सिनेमा ऑस्करसाठी सिलेक्ट झाला आहे.
मराठी सिनेमा </a>म्हणजे दशावतार. कोकणातील जमिनींचा प्रश्न या सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयानं संपन्न असलेल्या दशावतारने तिकिट बारी गाजवली. सिनेमाला फक्त महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं नाही तर जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. " width="1200" height="900" /> 2025 या वर्षात कमाई करणारा मराठी सिनेमा म्हणजे दशावतार. कोकणातील जमिनींचा प्रश्न या सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयानं संपन्न असलेल्या दशावतारने तिकिट बारी गाजवली. सिनेमाला फक्त महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं नाही तर जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
दशावतारचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आलेला मेलच सर्वांबरोबर शेअर केला आहे. त्यांनी म्हटलंय, "कष्टांचं, प्रामाणिकपणाचं, मोठं स्वप्नं पाहण्याचं चीज होतंच… फक्त कामावर विश्वास हवा, खाली मान घालून कष्ट करत राहण्याची चिकाटी हवी, पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची जिद्द हवी आणि विश्वास ठेवणाऱ्या माणसांची खंबीर साथ हवी"
advertisement
"आज 'दशावतार' ऑस्करच्या म्हणजेच अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत (Main open film category - contention list) निवडला गेल्याचा मेल आला आणि गेली अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्याची दखल घेतली गेल्याचं समाधान मिळालं. हे समाधान फक्त 'दशावतार' निवडला गेलाय म्हणून नाहीये, तर आपला मराठी चित्रपट जागतिक स्तरावर तोडीस तोड उभा राहू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय म्हणून आहे."
advertisement
त्यांनी पुढे लिहिलंय, "जिंकणं हरणं नंतरची गोष्ट, पण मुख्य जागतिक प्रवाहात मराठी चित्रपटाची दखल घेतली जाणं हे प्रचंड अभिमानास्पद आहे! ही फक्त सुरवात आहे, आम्ही सातत्याने चांगलं काहितरी तयार करण्याचा आणि ते जगासमोर आणून मराठीची मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू! प्रेम आणि आशीर्वाद असू द्या!"
advertisement
advertisement










