जोडवी पायाच्या दुसऱ्याच बोटात का घालतात? फक्त परंपराचं सायन्सशीही आहे खास कनेक्शन
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
जोडवी हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा अलंकार असून, त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक फायदे, कोणत्या बोटात घालाव्यात याची माहिती जाणून घ्या.
भारतीय संस्कृतीत विवाहित स्त्रीच्या 'सोळा शृंगारांपैकी' एक महत्त्वाचा अलंकार म्हणजे 'जोडवी'. लग्नानंतर पायात जोडवी घालणे हे केवळ सौभाग्याचे लक्षण मानले जात नाही, तर त्यामागे सखोल धार्मिक आणि वैज्ञानिक कारणेही दडलेली आहेत. आजही ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत जोडवी घालण्याची परंपरा जपली जाते. पण, जोडवी नेमकी कोणत्या बोटात घालावीत आणि त्याचे फायदे काय आहेत, हे जाणून घेणे रंजक ठरेल.
advertisement
चंद्राचे प्रतीक आणि चांदीचा वापर: जोडवी नेहमी चांदीचीच असावीत, असा शास्त्रांचा नियम आहे. चांदी हा धातू 'चंद्राशी' संबंधित मानला जातो. चंद्र हा मनाला शीतलता आणि शांती देणारा ग्रह आहे. चांदीची जोडवी पायात घातल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते आणि मनाला शांती मिळते. पायात सोन्याची जोडवी घालणे अशुभ मानले जाते, कारण सोने हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि ते पायात घालणे त्यांचा अनादर समजला जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विशेषतः 'अधिक महिन्यात' सुहासिनी महिला आवर्जून नवीन जोडवी घेतात. तसेच, आपली वापरलेली जोडवी कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत किंवा दुसऱ्याची वापरलेली आपण घालू नयेत, असे मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)










