Solapur News : सोन्या-चांदीचे दागिने, पैशांनी भरलेली बॅग रिक्षात विसरले; रिक्षाचालकाने बॅग आणून देताच देशमुख रडले!

Last Updated:

सोलापुरात एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी घटना घडली आहे. शहरातील रिक्षाचालक हरीश तरुण सय्यद अब्दुल रसूल जागीरदार या प्रामाणिक रिक्षाचालकाने आपले कर्तव्य पार पडले आहे.

+
Solapur

Solapur News : सोन्या-चांदीचे दागिने, पैशांनी भरलेली बॅग रिक्षात विसरले; रिक्षाचालकाने बॅग आणून देताच देशमुख रडले!

सोलापूर - सोलापुरात एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी घटना घडली आहे. शहरातील रिक्षाचालक हरीश तरुण सय्यद अब्दुल रसूल जागीरदार या प्रामाणिक रिक्षाचालकाने आपले कर्तव्य पार पाडत.माणुसकी जपत महिला प्रवाशांने मौल्यवान वस्तू असलेली बॅग रिक्षामध्ये विसरलेली बॅग महिला प्रवासीला परत केल्याने तरुण रिक्षाचालकाच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोलापूर शहरातील कोतंम चौकातून शेळगी या ठिकाणी जाण्यासाठी अंजली अजय देशमुख रिक्षा चालक हरीश सय्यद जहागिरदार यांच्या रिक्षामध्ये बसले होते.
महिला प्रवाशिनी रिक्षातून घरी गेल्यावर लक्षात आले की आपली बॅग दिसत नाही आणि त्या बॅगेमध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने,रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे होती.अचानक बॅग न सापडल्याने अंजली देशमुख यांच्यावर चिंता आणि काळजीचे ढग दाटले होते.
advertisement
तर दुसरीकडे रिक्षा चालकाने रिक्षामध्ये महिला प्रवासाची बॅग सापडल्यावर रिक्षाचालक हरीश सय्यद यांनी सोलापुरातील प्रहार संघटनेचे शहर संपर्कप्रमुख जमीर शेख यांना संपर्क केला असता तेव्हा त्या रिक्षा चालकांनी जमीर शेख यांच्या सल्ल्याने व त्यांच्या सोबत वेळ न लावता लगेच जेलरोड पोलीस स्टेशन ला जाऊन त्यांनी त्या पहिला प्रवाशाची बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली.
advertisement
त्यानंतर बॅगेत सापडलेल्या कागदपत्राच्या आधारे त्या महिलेचा शोध घेऊन मौल्यवान वस्तू असलेली बॅग पोलिसांच्या महिला प्रवासी अंजली देशमुख यांच्याकडे परत केली. अंजली यांना बॅग मिळतात अश्रू अनावर झाले. व रिक्षा चालकाचे दोन्ही हात जोडून आभार मानले.
हरीश सय्यद यांच्या या प्रामाणिक वर्तनामुळे केवळ अंजली देशमुख यांना दिलासा मिळाला नाही,तर संपूर्ण समाजात एक सकारात्मक संदेश पसरला असून सर्वत्र रिक्षाचालक हारीश सय्यद यांचे कौतुक होत आहे. रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा पाहून पोलिसांनी सुद्धा रिक्षाचालकास कौतुकाची थाप दिली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur News : सोन्या-चांदीचे दागिने, पैशांनी भरलेली बॅग रिक्षात विसरले; रिक्षाचालकाने बॅग आणून देताच देशमुख रडले!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement