Ashadhi Wari 2025: विठ्ठल भक्तांसाठी खूशखबर! आषाढी वारीसाठी 80 विशेष ट्रेन, कुठून कुठंपर्यंत धावणार?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Ashadhi Special Train: पंढरीच्या विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वे 80 आषाढी विशेष ट्रेन चालवणार आहे.
पंढरपूर: आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. 1 जुलै ते 10 जुलै या काळात मध्य रेल्वे पंढरपूर आणि मिरजसाठी 80 आषाढी विशेष ट्रेन चालवणार आहे. त्यामुळे वारकरी आणि विठ्ठल भक्तांचा प्रवास सुखकर आणि सोयीचा होणार आहे.
आषाढी विशेष गाड्या कुठे धावणार?
आषाढी वारीनिमित्त नागपूर ते मिरज 4 विशेष सेवा, नवीन अमरावती ते पंढरपूर 4 सेवा, खामगाव ते पंढरपूर 4 सेवा, भुसावळ ते पंढरपूर अनारक्षित विशेष गाडीच्या 2 सेवा, लातूर ते पंढरपूर अनारक्षित विशेष गाडीच्या 10 सेवा असतील. तसेच मिरज ते कलबुर्गी अनारक्षित विशेष गाड्यांच्या 20 सेवा, कोल्हापूर ते कुर्डुवाडी अनारक्षित विशेष गाड्यांच्या 20 सेवा आणि पुणे ते मिरज अनारक्षित विशेष गाड्यांच्या 16 सेवा चालवण्यात येतील.
advertisement
आषाढी विशेष ट्रेनचे आरक्षण विशेष शुल्कासह 16 जूनपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे आषाढी वारीच्या वेळी प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी विठ्ठल भक्तांना लवकरच आपले तिकीट बूक करावे लागेल.
advertisement
दरम्यान, आषाढी वारीसाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी एसटीने देखील जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रेल्वे देखील आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे.
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
June 12, 2025 7:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Ashadhi Wari 2025: विठ्ठल भक्तांसाठी खूशखबर! आषाढी वारीसाठी 80 विशेष ट्रेन, कुठून कुठंपर्यंत धावणार?