ambedkar jayanti 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते अध्यक्ष, सोलापुरात झाली होती ऐतिहासिक परिषद, अजेंडा काय होता?

Last Updated:

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विविध परिषदा आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात वतनदार महार परिषद संपन्न झाली होती.

+
News18

News18

सोलापूर : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विविध परिषदा आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहरातील आताचे मिलिंद नगर आणि तत्कालीन थोरल्या राजवाड्यातील पंचाच्या चावडीत 26 आणि 27 नोव्हेंबर 1927 रोजी वतनदार महार परिषद संपन्न झाली होती. या संदर्भात अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते आतिश बनसोडे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत बुधवार पेठेतील पंचाची चावडी येथे पार पडलेल्या ऐतिहासिक वतनदार महार परिषद झाली होती. 26 आणि 27 नोव्हेंबर 1927 रोजी झालेल्या या परिषदेच्या ठरावामध्ये त्यांनी धर्मांतराबाबत संकेत दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 14 वेळा भेटी दिल्या होत्या.
advertisement
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या परिवारातील मंडळीसह सभामंडपात आले होते. त्यांच्या येण्याबरोबर सर्व मंडळी सभामंडपात आली होती. त्यांच्या येण्याबरोबर सर्व मंडळींनी उभे राहून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनाची आस लागली होती. अखेर ते दर्शन पंचाच्या चावडीतील सभामंडपात झालं. या परिषदेसाठी शहर आणि जिल्ह्यातून साधारणतः 5 हजारापेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित होता. स्वागत अध्यक्ष जिवाप्पा सुभानराव ऐदाळे यांनी स्वागतपर भाषण केले.
advertisement
माणसाला माणूस म्हणून वागवले पाहिजे. चातुर्वर्णीय व्यवस्था बंद केली पाहिजे. एक वर्ण निर्माण केला पाहिजे. सर्वांना समान अधिकार मिळायला पाहिजेत. ही भूमिका आता स्पृश्य समाजाने घेतली पाहिजे. अन्यथा अस्पृश्य जनतेला वेगळा निर्णय घ्यावा लागेल याशिवाय दुसरा पर्याय नाही. धर्मांतराचा निर्णय घ्यावा लागेल असा ठराव करण्यात आला होता.
या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे शहर आणि जिल्ह्यातून उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी त्यावेळी लोकवर्गणी जमा करून सुमारे 445 रुपये लोकवर्गणी बहिष्कृत हितकारिणी सभेच्या कार्यासाठी दिली होती. हे या परिषदेचे वैशिष्ट्य होते. याच अनुषंगाने दुसरी सोलापूर जिल्हा वतनदार महार परिषद ऐतिहासिक आणि क्रांतिकारक ठरली होती.
advertisement
या परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी जिवाप्पा सुभानराव ऐदाळे होते तर चिटणीसपदी उध्दव धोंडो शिवशरण होते. खजिनदारपदी हरिभाऊ तोरणे होते तर परिषदेचे कार्यकारी सदस्य म्हणून विश्वनाथ मेघाजी बनसोडे, मुकिंदा कुंडलिका बाबरे, निवृत्ती तुकाराम बनसोडे, रामा तुकाराम सरवदे, पापा सोमाजी तळभंडारे, विठ्ठल सरवदे, भिकाजी गुराप्पा तळभंडारे, तुकाराम अंदुबा बाबरे, बळी तुळजाराम तळमोहिते यांच्यासह मान्यवर हजर होते, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते आतिश बनसोडे यांनी दिली.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
ambedkar jayanti 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते अध्यक्ष, सोलापुरात झाली होती ऐतिहासिक परिषद, अजेंडा काय होता?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement