Solapur Success Story : 3 हजार रुपयांची गुंतवणूक करुन व्यवसाय सुरू, आता 5 लाखांची उलाढाल
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सादिक बेग हे सोलापूर शहरातील गुरुनानक चौक, कुर्बान हुसेन नगरमध्ये राहतात. त्यांचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. 2005 पासुन सादिक बेग गिफ्ट बनविण्याचे काम करत आहेत. लॉकडाऊनमध्ये सादिक यांनी घरात बसून ट्रॉफी कशाप्रकारे बनविले जाते, यावर अभ्यास केला आणि 3 हजार रुपयांपासून ट्रॉफी बनविण्याच्या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. ही म्हण सर्वांनीच ऐकली असेल. याचेच एक उत्तम उदाहरण सोलापूर शहरातील सादिक बेग ही व्यक्ती आहे. त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वतःचा ट्रॉफी बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. 3 हजार रुपयांपासून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. यातून आता लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. आज जाणून घेऊयात त्यांची प्रेरणादायी कहाणी.
advertisement
सादिक बेग हे सोलापूर शहरातील गुरुनानक चौक, कुर्बान हुसेन नगरमध्ये राहतात. त्यांचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. 2005 पासुन सादिक बेग गिफ्ट बनविण्याचे काम करत आहेत. लॉकडाऊनमध्ये सादिक यांनी घरात बसून ट्रॉफी कशाप्रकारे बनविले जाते, यावर अभ्यास केला आणि 3 हजार रुपयांपासून ट्रॉफी बनविण्याच्या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली.
advertisement
सादिक बेग यांच्या विनर ट्रॉफी शॉपमध्ये 50 रुपयांपासुन ते 10 हजार रुपयांपर्यंतची ट्रॉफीही या ठिकाणी मिळते. शाळा, कॉलेज, क्रिकेट क्लबचे सदस्य या ठिकाणी येऊन आपल्या इच्छेनुसार ट्रॉफी बनवून घेऊन जातात. विशेष म्हणजे याठिकाणी कमी दरामध्ये व उत्तम कॉलिटीमध्ये या ठिकाणी ट्रॉफी बनवुन दिली जाते. क्लबचे नाव, विनरचे नाव, यावर प्रिंट करून देण्यासाठी कोणतेही कॉस्ट घेतली जात नाही.
advertisement
रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले तरुणाचे प्राण, काळजाचा ठोका चुकविणारी सोलापुरातील घटना, VIDEO
यासोबतच या विनर ट्रॉफी शॉपमध्ये ट्रॉफीसह सर्टिफिकेट, मेडल, प्रमाणपत्रही बनवून दिले जाते. उडन ट्रॉफी, मोमेंटो ट्रॉफी, ऍग्रीलिक ट्रॉफी, फायबर ट्रॉफी, मेटल ट्रॉफी, डायमंड ट्रॉफी या ठिकाणी बनवून दिले जाते. तसेच ग्राहकांना ज्याप्रकारे ट्रॉफी बनवून घ्यायची असेल त्याप्रकारेही या ठिकाणी ट्रॉफी बनवून दिले जाते.
advertisement
या ट्रॉफीच्या व्यवसायातून वर्षाखेर 4 ते 5 लाखांची उलाढाल होत आहे. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. तुम्हालाही यासंबंधी काही खरेदी करायचे असेल तर तुम्ही याठिकाणी येऊन खरेदी करू शकतात.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
August 21, 2024 3:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Success Story : 3 हजार रुपयांची गुंतवणूक करुन व्यवसाय सुरू, आता 5 लाखांची उलाढाल