रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे-सोलापूर मार्गावर 22 दिवस ट्रेन बंद राहणार, कारण काय?
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Central Railway: प्रवाशांनी प्रवास करत असताना आपल्या प्रवासाचे नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सोलापूर – मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दौंड - काष्टी स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाच्या कामामुळे ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर विभागातील स्थानकांमधून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या रिशेड्युल करण्यात आल्या असून प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागामार्फत करण्यात आले आहे.
दुहेरीकरणामुळे या गाड्या रद्द
दौंड - मनमाड विभागातील दौंड - काष्टी स्थानकादरम्यान दुहेरी करण्यासाठी या कालावधीत 4 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 पर्यंत महत्त्वाच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक 01461 - सोलापूर - दौंड डेमू स्पेशल व गाडी क्रमांक 01462 - दौंड डेमू स्पेशल - सोलापूर ही गाडी 4 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
advertisement
गाडी क्रमांक 12169 पुणे - सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस व गाडी क्रमांक 12170 सोलापूर - पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 15 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 12157 पुणे - सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस व गाडी क्रमांक 12158 सोलापूर - पुणे हुतात्मा एक्सप्रेस 24 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
advertisement
गाडी क्रमांक 01487 पुणे - हरंगुळ स्पेशल व गाडी क्रमांक 01488 हरंगुळ - पुणे स्पेशल 24 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 11421 हडपसर - सोलापूर डेमू व गाडी क्रमांक 11422 सोलापूर - हडपसर डेमू 24 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
advertisement
गाडी क्रमांक 14613 पनवेल - नांदेड एक्सप्रेस व गाडी क्रमांक 17614 नांदेड - पनवेल एक्सप्रेस 24 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 01422 कलबुर्गी - दौंड स्पेशल व गाडी क्रमांक 01425 दौंड - कलबुर्गी स्पेशल 24 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
advertisement
गाडी क्रमांक 11413 निजामाबाद - पंढरपूर एक्सप्रेस व गाडी क्रमांक 11414 पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस 24 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
या गाड्यांचे मार्ग बदलले
गाडी क्रमांक 16332 तिरुवनंतपुरम - सीएसटी मुंबई एक्सप्रेस 24 जानेवारी 2026 पासून कुर्डूवाडी मिरज- पुणे मार्गे वळवली जाणार आहे. तर गाडी क्रमांक 11302 केएसआर बंगळूर - सीएसएमटी मुंबई उद्यान एक्सप्रेस 24 जानेवारीपासून कुर्डूवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवली जाणार आहे. तसेच गाडी क्रमांक 20657 हुबळी हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस 23 जानेवारीपासून सोलापूर - कुर्डुवाडी - लातूर - परळी - वैजनाथ - परभणी - छत्रपती संभाजीनगर - मनमाड मार्गे वळवण्यात येणार आहे.
advertisement
या गाड्या रिशेड्युल
view commentsगाडी क्रमांक 12628 नवी दिल्ली - केएसआर बेंगळूर कर्नाटक एक्सप्रेस 23 जानेवारी रोजी 1 तास 40 मिनिटांसाठी नियंत्रित केली जाणार आहे. प्रवाशांनी प्रवास करत असताना आपल्या प्रवासाचे नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 11:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे-सोलापूर मार्गावर 22 दिवस ट्रेन बंद राहणार, कारण काय?






