Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर 5 दिवसांचा वाहतूक ब्लॉक, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी 5 दिवस वाहतूक बदलाची माहिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.
मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर येत्या चार दिवसांसाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (ता. चांदूर रेल्वे) आणि नांदगाव खंडेश्वर परिसरात विविध ठिकाणी तांत्रिक व देखभाल कामांसाठी हा वाहतूक ब्लॉक असेल. 9 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमध्ये एकूण 10 टप्प्यांत काही काळासाठी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कधी आणि कुठं ब्लॉक
9 जानेवारी रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड गावाजवळील साखळी क्रमांक 120.300 तसेच धोत्रा गावाजवळील साखळी क्रमांक 125.400 या ठिकाणी मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे. त्यानंतर 10 जानेवारी रोजी चांदूर रेल्वे येथील खंबाळा गावाजवळील साखळी क्रमांक 130.400 येथे मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी 12 ते 1 या वेळेत बंद राहील.
advertisement
12 जानेवारी रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील शहापूर खेकडी गावाजवळील साखळी क्रमांक 145.200 येथे नागपूरकडे जाणारी वाहतूक दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याच दिवशी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पाचोड गावाजवळील साखळी क्रमांक 140.500 येथे नागपूर वाहिनीवरील वाहतूकही दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
advertisement
13 जानेवारी रोजी नांदगाव खंडेश्वर येथील देऊळगाव परिसरातील साखळी क्रमांक 150.300 येथे मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत बंद राहील. तसेच त्याच दिवशी शहापूर खेकडी गावाजवळील साखळी क्रमांक 145.200 येथेही मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी 12 ते 1 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक बदलाची माहिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. तसेच शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाहतूक पोलीस आणि महामार्ग प्रशासनाकडून सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 9:36 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर 5 दिवसांचा वाहतूक ब्लॉक, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर










