दुष्काळी स्थितीमुळे मेंढपाळांच्या जीवनात भटकंती, पोटाची खळगी भरण्यासाठीची ही संघर्षमय कहाणी!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो. शेतकरी कष्टातून शेती पिकवतो, तर मजूर मजुरी करून कुटुंब चालवितो. प्रत्येकाची जीवन जगण्याची एक रित ठरलेली आहे. पण पोटाची खळगी भरण्यासाठी घर-दार सोडून मेंढपाळांना बाहेर पडावे लागते.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : राज्यात प्रामुख्याने धनगर समाज हा मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतो. भरपूर वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. भटकंती करत असताना मेंढपाळांना रानमाळावर अंधारात राहावे लागते. बदलत्या काळानुसार या पारंपारिक व्यवसायावरही परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत मेंढपाळ कशा प्रकारचे जीवन जगत आहेत, हेच आपण जाणून घेणार आहोत.
सातारा येथील मानखटाव तालुक्यातून निघालेले मेंढपाळ घरी जाण्याच्या मार्गावर असून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पेनुर या गावात मुक्कामी होते. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो. शेतकरी कष्टातून शेती पिकवतो, तर मजूर मजुरी करून कुटुंब चालवितो. प्रत्येकाची जीवन जगण्याची एक रित ठरलेली आहे. पण पोटाची खळगी भरण्यासाठी घर-दार सोडून मेंढपाळांना बाहेर पडावे लागते.
advertisement
मेंढपाळ उन्हाळ्यात मेंढ्या चारण्यासाठी बाहेर पडतो. उन्हा, तान्हात मेंढ्या चारण्यासाठी या गावातून त्या गावात भटकंती करतो. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला खूप संघर्षमय प्रवास करावा लागतो. एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जावे लागते. उन्हाळ्यात आलेले मेंढपाळ पावसाळा लागला तरी तग धरून राहतात तर भर पावसाळ्यात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात ऊन सहन करावे लागते, तर पावसाळ्यात पाऊस अंगावर झेलावा लागतो.
advertisement
वारीच्या वाटेत रमला अन् सोडली दारू, पांडरंगाच्या भक्तीत लीन झालेल्या व्यक्तीची प्रेरणादायी गोष्ट!
विविध प्रकारचे सण आनंदाने साजरे करता येत नाहीत, राहण्यासाठी घर नाही की दार नाही, अशा परिस्थितीत जीवन जगताना मानवी जीवनाचाही विसर पडतो. मेंढपाळांच्या या दशेवरून मेंढपाळांची सरकारने दखल घेतली पाहिजे, असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 06, 2024 3:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
दुष्काळी स्थितीमुळे मेंढपाळांच्या जीवनात भटकंती, पोटाची खळगी भरण्यासाठीची ही संघर्षमय कहाणी!