वारीच्या वाटेत रमला अन् सोडली दारू, पांडरंगाच्या भक्तीत लीन झालेल्या व्यक्तीची प्रेरणादायी गोष्ट!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
गेल्या अनेक वर्षापासून ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. वारीमुळे गणेश यांच्या आयुष्यात बराच बदल घडला. तसेच वारीच्या वाटेने त्यांना जगायचं शिकवलं.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : भारतभूमी ही जशी कृषीप्रधान भूमी आहे, तशीच येथील संस्कृती ही भक्तिरसाने ओथंबलेली आहे. राज्यभरातून अनेक भाविक विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. पंढरपूरच्या वाटेवर वारकऱ्यांचे अनेक अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्यातून काहीतरी शिकायला देखील मिळते. आज आपण अशाच एका वारकऱ्याच्या विषयी जाणून घेणार आहोत.
वारीत गेल्या 6 वर्षांपासून सहभागी होणारे गणेश जाधव हे मूळचे संभाजीनगर मधील फुलंब्री तालुक्यातील रहिवाशी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. वारीमुळे गणेश यांच्या आयुष्यात बराच बदल घडला. तसेच वारीच्या वाटेने त्यांना जगायचं शिकवलं.
advertisement
वारी 2024 : तुकोबांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, VIDEO
वारीविषयीचा त्यांचा अनुभव सांगताना ते म्हणतात कि, मी सुरुवातीला संपूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेलो होतो. घर-संसार सगळ्यांची काळजी करणं सोडून दिलं होत. अति व्यसनामुळे माझा अपघात झाला आणि यात माझ्या डोक्याला मार लागला. परंतु पांडुरंगामुळे मी वाचलो आणि मग मी भक्तीच्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला. आमच्यामुळे आमच्या नंतरची पिढीदेखील निर्व्यसनी झाली. पांडुरंगाच्या चरणी खरं सुख आहे. आयुष्यात एकदातरी वारी करावी. वारी आपल्याला जगायला शिकवते, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
advertisement
वारकरी संप्रदायाने जितके महत्व या विठ्ठलाच्या पंढरपूर वारीला दिलेले आहे, तितके महत्व अन्य कोणत्याही संप्रदायाने आपल्या दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायात वर्षातील दोन वाऱ्यांना अनन्यसाधारण असे महत्व देण्यात आले आहे. वारी माणसाला नव्याने जगायला शिकवते अशीच शिकवण या माध्यमातून मिळते. संतांनी दिलेल्या शिकवणीनुसार आपण वागलो तर आपले जीवन नक्कीच आनंदमय होईल, यात काही शंका नाही, असेही ते म्हणाले.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 05, 2024 4:53 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
वारीच्या वाटेत रमला अन् सोडली दारू, पांडरंगाच्या भक्तीत लीन झालेल्या व्यक्तीची प्रेरणादायी गोष्ट!

