उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा पुढाकार, विठुरायाच्या वारीत राबवला जातोय पर्यावरणपूरक उपक्रम, काय आहे हा उपक्रम
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
वारीत यंदा उत्कर्ष फाउंडेशनने पर्यावरण संरक्षण मोहीम राबवली आहे. तर मग ही मोहीम नेमकी काय आहे, हे जाणून घेऊयात.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही पालखी पुण्यामध्ये दाखल झाल्या आहेत. पंढरपूरला जाणाऱ्या या वारीमध्ये प्रत्येक जण हा काही ना काही आपली विशेष सेवा हे देत असतो. जसे की, कुणी लाडू, बिस्कीट, चहा तर जेवण देत असतो. पण त्याचप्रमाणे उत्कर्ष फाउंडेशनने पर्यावरण संरक्षण मोहीम राबवली आहे. तर मग ही मोहीम नेमकी काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
फाऊंडेशच्या वतीने 5 वेगवेगळ्या राज्यामध्ये काम केले जाते. पर्यावरण संरक्षण, महिला शिक्षण आणि आरोग्य यामध्ये गेली 30 वर्षांपासून फाउंडेशन काम करत आहे. वारीमध्ये हा उपक्रम सुरू करण्याचं पहिलंच वर्ष आहे. यावेळी पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये वारीच्या सुरुवातीपासून ते वारी पूर्ण होईपर्यंत कापडी पिशवी आणि स्टील बॉटल वाटप केले जाणार आहे.
advertisement
वारीमध्ये अनेक लोक हे प्लास्टिक कॅरी बॅग, प्लास्टिक बॉटल वापरतात. तसेच अनेकवेळा ते फेकून देतात. त्याचा पुन्हा वापर कुणी करत नाही. त्यामुळे प्रदूषण हे होते. त्यासाठी आम्ही स्टील बॉटल आणि कापडी पिशवी लोकांना वाटत आहे. जवळजवळ अडीच लाख पाणी बॉटल आणि पाच लाख कापडी पिशवी वाटप करत आहोत.
advertisement
काल देहूत 50 हजार बॉटल आणि 50 हजार पिशवीचे वाटप केले गेले. हा उपक्रम 17 जुलैपर्यंत म्हणजे संपूर्ण वारी संपेपर्यंत करणार आहोत, अशी माहिती उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या कार्यकर्त्या रसिका कश्यप यांनी दिली. दरम्यान, उत्कर्ष फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
July 01, 2024 5:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा पुढाकार, विठुरायाच्या वारीत राबवला जातोय पर्यावरणपूरक उपक्रम, काय आहे हा उपक्रम

