Solapur Flood: संकटात पांडुरंग धावला! श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Solapur Flood: अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यावर महापुराचं संकट ओढावलं आहे. या संकट काळात पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मदतीचा हात दिला आहे.
सोलापूर: अतिवृष्टीमुळे सोलापुरातील नद्यांनी रौद्ररूप धारण केले असून अनेक गावांना महापुराने विळखा घातला आहे. अनेक रस्ते ठप्प असून महापुरात अडकलेल्यांसाठी बचावकार्य सुरू आहे. महापुराच्या संकटात अडकलेल्या सोलापूरकरांच्या मदतीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती सरसावली आहे. मंदिर समितीच्या वतीने 23 सप्टेंबर रोजी पूरग्रस्तांसाठी मदतकार्य करण्यात आले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून बार्शी आणि माढा तालुक्यांतील पूरग्रस्त गावांत मदत साहित्य पोहोचवण्यात आले. बार्शीतील भोईंजे आणि माढा तालुक्यातील सुलतानपूर येथे सीना नदीच्या पुरात अडकलेल्यांसाठी मदत पाठवण्यात आली. यामध्ये 500 अन्नपाकिटे, 500 लाडू प्रसाद पाकिटे, 500 पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या यांचा समावेश आहे. ही सर्व मदत सामग्री सर्कल अधिकारी शिंदे यांचेकडे सुपूर्द करण्यात आली.
advertisement
महाराष्ट्रात आकस्मिक आलेल्या पुराच्या संकटात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत मानवतेच्या दृष्टीने मदतकार्य अविरतपणे सुरू आहे. सह-अध्यक्ष, मंदिरे समितीचे सदस्य व कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त बांधवांना वेळेत अन्नपाकिटे व आवश्यक साहित्य पुरविण्याचे कार्य सातत्याने राबविले जात आहे.
advertisement
या मदतकार्यावेळी सदस्य जळगावकर महाराज, सदस्या नडगिरे, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखाधिकारी मुकेश आनेचा यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अन्नपाकिटे व आवश्यक साहित्याची पाहणी करून पूरग्रस्त भागात पोहोचविण्याची व्यवस्था केली. यामुळे पूरग्रस्तांत संकटात पांडुरंग मदतीला धावल्याची भावना आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 24, 2025 10:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Flood: संकटात पांडुरंग धावला! श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात