Solapur Mumbai Flight: सोलापूर – मुंबई विमानसेवेला सप्टेंबरचा मुहूर्त, गणेशोत्सवात बुकिंग, उड्डाण कधी?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Solapur Mumbai Flight: गेल्या काही काळापासून सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा सुरू आहे. आता या विमानसेवाला सप्टेंबरचा मुहूर्त मिळणार आहे.
सोलापूर: बहुप्रतीक्षित सोलापूर – मुंबई विमान सेवा लवकरच सुरू होणार आहे. येत्या गणेशोत्सवात तिकीट बुकिंग सुरू होणार असून सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यांत सोलापुरातून विमान उड्डाण घेईल, अशी माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींची दीर्घकाळापासून प्रलिंबित मागणी लवकरच पूर्ण होणार आहे.
सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी ‘डीजीसीए’कडून स्टार एअरला परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट ऑथॉरिटी यांच्याशीही स्टार एअरचा करार झाला आहे. त्यामुळेच लवकरच ही विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
महाराष्ट्र एअरपोर्ट ऑथॉरिटीसोबत स्टार एअरचा करार झाल्याने सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता गणेशोत्सवकाळातच बुकिंग सुरू होणार असून साधारणत: सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातच विमानाचे पहिले उड्डाण होईल, असे सांगितले जातेय. ही विमानसेवा सुरू झाल्याने सोलापूरचा औद्योगिक, व्यापारी, पर्यटन आणि शैक्षणिक विकास होण्यास चालना मिळेल.
advertisement
दरम्यान गेल्या जून महिन्यात सोलापूर – गोवा विमानसेवेला प्राऱंभ झाला. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. विजयपूर, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशंना गोव्याला जाण्यासाठी ही विमानसेवा सोयीची ठरत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Aug 22, 2025 11:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Mumbai Flight: सोलापूर – मुंबई विमानसेवेला सप्टेंबरचा मुहूर्त, गणेशोत्सवात बुकिंग, उड्डाण कधी?









