Solapur News: डॉ. आंबेडकर जयंती मिरवणूक, सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल, हे रस्ते बंद, पाहा पर्यायी मार्ग

Last Updated:

Solapur News: सोलापुरात 20 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून काही रस्ते बंद राहणार आहे.

Solapur News: आंबेडकर जयंती मिरवणूक, सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल, हे रस्ते बंद, पाहा पर्यायी मार्ग
Solapur News: आंबेडकर जयंती मिरवणूक, सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल, हे रस्ते बंद, पाहा पर्यायी मार्ग
सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी 20 एप्रिल रोजी शहरातून विविध उत्सव मंडळाकडून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील प्रमुख तीन वाहतूक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. या मिरवणूका दरम्यान वाहतूककोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले आहे.
रविवारी 20 एप्रिल रोजी मिरवणुकीच्या दिवशी हैदराबाद, तुळजापूर-पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पत्रकार भवन चौक-महावीर चौक-गुरूनानक चौक-संत तुकाराम चौक-अशोक चौक-शांती चौक-जुना बोरामणी नाका चौकातून मार्केट यार्ड हा मार्ग वापरता येईल. तर मंगळवेढ्याकडून होटगी रोड व विजयपूर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना मरिआई चौक-नागोबा मंदिर- रामवाडी पोलिस चौकी-मोदी बोगदा- पत्रकार भवनपासून पुढे जाता येईल.
advertisement
जुना पुना नाका चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांसाठी जुना पुना नाका-जुना कांरबा नाका-जुना तुळजापूर नाका- बोरामणी नाका- शांती चौक-रंगभवन- सातरस्ता-मोदी पोलिस चौकी-मोदी बोगदा-रामवाडी दवाखाना-रामवाडी पोलिस चौकी-रेल्वे स्टेशन किंवा जुना पुना नाका-नवीन केगाव बायपासमार्गे देगाव नाक्याकडून मरिआई चौक-नागोबा मंदिर ते रेल्वे स्टेशन हा मार्ग उपलब्ध असणार आहे.
20 तारखेला बंद असणारे मार्ग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान-सम्राट चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक, हॉटेल ॲम्बेसिडर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक- मेकॅनिक चौक- सरस्वती चौक- चार पुतळा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- डफरीन चौक- जुना एम्प्लॉयमेंट चौक- वाडीया हॉस्पिटल-चांदणी चौक- महापौर निवास- रेल्वे स्टेशन गांधी पुतळा- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक- मेकॅनिकी चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील.
advertisement
तसेच यादिवशी विजयपूर, मंगळवेढ्याकडून येणाऱ्या जड वाहनांसाठी नवीन केगाव बायपास रोड व अक्कलकोटकडून येणाऱ्या जड वाहनांसाठी नवीन अक्कलकोट नाका-शांती चौक-जुना बोरामणी नाका-मार्केट यार्डापासून पुढे, असा मार्ग उपलब्ध असणार आहे. 20 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 21 एप्रिलच्या पहाटे दोन वाजेपर्यंत हा बदल असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News: डॉ. आंबेडकर जयंती मिरवणूक, सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल, हे रस्ते बंद, पाहा पर्यायी मार्ग
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement