नशिबाने केली थट्टा, पण त्याने दगडात घडवला देव, सोलापूरच्या अमोलची कहाणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
अंगी जर कला असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करत येते. हे सिद्ध करून दाखविले आहे सोलापूर जिल्ह्यातील अमोल गोटे या तरुणाने.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : अंगी जर कला असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करत येते. हे सिद्ध करून दाखविले आहे सोलापूर जिल्ह्यातील अमोल गोटे या तरुणाने. घरातील हलाखीच्या परिस्थितीवर मात करत स्वतः दगडावरील नक्षी काम शिकून आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. दगडापासून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, दगडापासून मंदिर बनवणे, ग्राहकांना जे हवं ते नक्षीकाम करून देण्याच काम अमोल गोटे हा तरुण करत आहे.
advertisement
अमोल नागनाथ गोटे राहणार अक्कलकोट सोलापूर असे या दगडावर नक्षीकाम करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अमोल गोटे यांच्या घरची परिस्थिती हालाखीची होती. दहावीपर्यंत शिक्षण घेऊन वडिलांसोबत अमोल हा काम दगडावरील नक्षीकाम करायला जात होता. एका वर्षात अमोल गोटे यांनी काम शिकून घेतले.
advertisement
दगडापासून मंदिर बनवणे, तुळशी माळ बनवणे, दगडापासून कोणतीही वस्तू बनवण्याची कला अमोल यांनी स्वतःच्या अंगी आत्मसात केली आहे. तुळशी वृंदावन बनवण्याच काम दोन आठवड्यात काम अमोल गोटे यांनी कोल्हापूर येथे जाऊन शिकून घेतले. अमोल गोटे यांना या कामाची मजुरी दिवसाला पंधराशे रुपये मिळते. जर अंगावर काम घेतले तर दोन ते तीन हजार रुपये दिवसाला मजुरी मिळते.
advertisement
शिक्षण शिकलेल्या तरुणांनी आपल्या अंगी जर कला आत्मसात केले तर नोकरीपेक्षाही जास्त उत्पन्न कमवू शकतो तसेच नोकरी पेक्षा कलेला जास्त किंमत असते आणि स्वतःच्या पायावर स्वतः आपण उभे राहू शकतो. जर नोकरी मिळत नसेल तर तरुणांनी आपल्या अंगी कला आत्मसात करावे आणि त्या कलेचा माध्यमातून आपण जास्तीत जास्त उत्पन्न मिळवावे, असे आवाहन दहावी शिकलेले अमोल गोटे यांनी केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
November 29, 2024 3:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
नशिबाने केली थट्टा, पण त्याने दगडात घडवला देव, सोलापूरच्या अमोलची कहाणी