शरद पवारांना भेटलेले ते दोघे कोण? कुणी दिली 160 जागांची गॅरंटी? निवडणूक, निकाल अन् गौप्यस्फोटाचं टायमिंग!

Last Updated:

विधानसभा निवडणुकीआधी दोघे दिल्लीत भेटले. त्यांची नावं आता माझ्याकडे नाही. त्यांनी २८८ पैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला.

शरद पवार
शरद पवार
मुंबई : मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये गौप्यस्फोट केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं मला भेटायला आली होती. त्या दोघांनी १६० जागांवर मतांचा फेरफार करण्याबाबत सांगितल्याचा प्रसंग शरद पवार यांनी जाहीरपणे कथन केला. यावरून मोठं राजकारण सुरू झालं आहे. ते दोघे कोण? हा मोठा प्रश्नही निर्माण झालाय.
विधानसभा निवडणुकीआधी दोघे दिल्लीत भेटले. त्यांची नावं आता माझ्याकडे नाही. त्यांनी २८८ पैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली. त्यानंतर राहुल गांधींशी त्यांची भेट करून दिली. पण त्यावेळी राहुल गांधी आणि माझे मत असे काही करणे योग्य नाही. हा आपला रस्ता नाही, त्यामुळे आपण लोकांकडे जाऊन आणि त्यांचे आशीर्वाद मिळवू असा निर्णय आम्ही घेतल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
advertisement
शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाला आदित्य ठाकरेंनी सकारात्मकता दर्शवली. विरोधकांनी शरद पवारांच्या गौप्यस्फोटाची पाठराखण केली खरी मात्र यावरून अनेक प्रश्नही उपस्थित झालेत. पवारांना भेटलेले ते दोघे कोण होते, शरद पवार तेव्हाच का बोलले नाहीत, शरद पवारांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांना या बाबत का कळवलं नाही? असे मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जाताहेत. तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली. राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम झालेला दिसतोय, असा टोलाही फडणवीसांनी शरद पवारांवर लगावला. 'पवार साहेब इतके दिवस बोलले नाही' असा प्रश्नही फडणवीस यांनी विचारला.
advertisement
विधानसभा निवडणुकीला आता जवळपास नऊ महिने होताहेत. त्यामुळे पवारांनी हा गौप्यस्फोट आताच का केलाय, ज्यावेळी ते दोघे पवारांना भेटले, त्यावेळीच पवारांनी गौप्यस्फोट का केला नाही? याच प्रश्नांभोवती सध्या राजकारण फिरत असल्याचं पाहायला मिळतंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवारांना भेटलेले ते दोघे कोण? कुणी दिली 160 जागांची गॅरंटी? निवडणूक, निकाल अन् गौप्यस्फोटाचं टायमिंग!
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement