advertisement

बापाचं स्वप्न की अंत्यविधी? काळजावर दगड ठेवून लेक परीक्षेला बसली; सोलापूरच्या धनश्रीची करुण कहाणी

Last Updated:

दहावीच्या मराठीच्या पहिल्या पेपरच्या दिवशीच धनश्रीवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.

News18
News18
सोलापूर :   सोलापूर येथील शरदचंद्र पवार प्रशालेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या धनश्री भिकाजी पवार हिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगातही तिने दाखवलेल्या धैर्याने सर्वांचेच मन हेलावून गेले आहे. शुक्रवारी दहावीच्या मराठीच्या पहिल्या पेपरच्या दिवशीच धनश्रीवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. वडील भिकाजी पवार यांचे सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. घरात शोककळा पसरली तर अंत्यविधीसाठी नातेवाईक व शेजारी जमा होऊ लागले.
धनश्रीने परीक्षेसाठी मनापासून तयारी केली होती. वडिलांनी तिच्या शिक्षणाबाबत मोठी स्वप्ने पाहिली होती. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुळे तिचा पहिलाच पेपर बुडणार की काय, अशी भीती निर्माण झाली. ही बाब लक्षात येताच शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तातडीने धनश्रीच्या घरी जाऊन तिच्या आई, भाऊ आणि नातेवाईकांना समजावून सांगितले. दोन तास अंत्यविधी पुढे ढकलण्याची विनंती करत, धनश्रीला परीक्षेला बसवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी पटवून दिले.
advertisement

दीड तास पेपर झाल्यानंतर अंत्यविधीसाठी सोडण्याचा निर्णय

मुख्याध्यापक तानाजी माने यांनी स्वतः धनश्रीला धीर दिला, तिला परीक्षेसाठी तयार केले आणि स्वतः परीक्षा केंद्रावर नेऊन परीक्षेला बसविले. मात्र, मनावरील दुःखाचे ओझे आणि मानसिक ताणामुळे तिला पूर्ण तीन तास परीक्षेला बसणे शक्य नव्हते.  पेपर देताना तिला अनेकदा वडिलांच्या आठवणीने हुंदका दाटून येत होता. पण त्याही परिस्थितीत तिने आपला पेपर सोडवला. त्यामुळे अर्ध्यातूनच तिला अंत्यविधीसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी संपर्क साधण्यात आला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी केंद्रप्रमुख श्रीमती गीता सादुल यांना आवश्यक सूचना दिल्या.
advertisement

शाळेतील उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्वतः परीक्षा केंद्रावर येऊन धनश्रीची भेट घेत तिला धीर दिला. दीड तास पेपर लिहिल्यानंतर मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिला संतोष लोंढे या सेवकाच्या वाहनातून अंत्यविधीसाठी घरी नेले. परीक्षेच्या ताणाखाली आणि वडिलांच्या निधनाच्या दुःखातही धनश्रीने दाखवलेले धैर्य, चिकाटी आणि जिद्द पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.
advertisement

धनश्रीच्या जिद्दीचे कौतुक  

या हृदयस्पर्शी घटनेने समाजात संवेदनशीलता, शिक्षकांचे कर्तव्यभाव आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांचे दर्शन घडवले आहे.  धनश्रीच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बापाचं स्वप्न की अंत्यविधी? काळजावर दगड ठेवून लेक परीक्षेला बसली; सोलापूरच्या धनश्रीची करुण कहाणी
Next Article
advertisement
IND vs SA : 14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या उडवणार
14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या
  • टीम इंडियाचं सिक्रेस सेशन

  • भारताच ब्रम्हास्त्र आफ्रिकेला धुळ चारणार

  • आफ्रिकेच काही खरं नाही

View All
advertisement