चकली आणि लाडूला भन्नाट चव, खाताच लागेल टेस्ट; शून्यातून उभा केलेला व्यवसाय आज गाजवतोय अख्खं मार्केट

Last Updated:

आपल्यापैकी अनेक गृहिणींची इच्छा असते आपण देखील आपल्या पायावरती उभे राहून काहीतरी करावं. नोकरी असो वा व्यवसाय असो जेणेकरून आपल्या कुटुंबाला त्याचा हातभार लागेल.

+
‎

‎ शिल्पा  यांनी घरातून सुरु केला छोटासा व्यवसायातून आज कमावतात त्या महिन्याकाठी

छत्रपती संभाजीनगर: आपल्यापैकी अनेक गृहिणींची इच्छा असते आपण देखील आपल्या पायावरती उभे राहून काहीतरी करावं. नोकरी असो वा व्यवसाय असो जेणेकरून आपल्या कुटुंबाला त्याचा हातभार लागेल. अशीच इच्छा छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या शिल्पा पाटील यांची देखील होती आणि त्यांनी स्वतःचा एक छोटा ग्रह उद्योग सुरू केलेला आहे आणि याच्या माध्यमातून आज त्या महिन्यासाठी चांगलं उत्पन्न कमवत आहेत तर आपण शिल्पा यांच्याकडून जाणून घेणार आहोत याची सुरुवात त्यांनी कशी केली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरामध्ये शिल्पा पाटील या राहतात 1998 पासून व्यवसाय करतात सुरुवातीला त्यांचा कपड्याचा व्यवसाय होता. हा व्यवसाय त्यांचा व्यवस्थित चालू होता. पण त्यांना आधीपासून वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड होती विशेष करून त्या चकली छान बनवायचा म्हणून त्यांनी ठरवले की आपण देखील यामध्ये काहीतरी करूयात सुरुवातीला त्यांनी घरातूनच व्यवसाय सुरू केला. सुरुवातीमध्ये मैत्रिणी आणि शेजारी पाजाऱ्यांना त्यांनी त्यांची चकली दिली त्यांना चव आवडली आणि तिथून त्यांनी व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. चकली बरोबरच त्या खानदेश स्पेशल गव्हाच्या पिठाचे लाडू देखील छान बनवायचा. आणि सुरुवातीला फक्त चकली आणि गव्हाचे लाडू यांचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
हळूहळू त्यांच्या चकली आणि या लाडूला शहरामधून मोठे मागणे यायला लागले. शहरातील अनेक जे स्वीट मार्ट आहेत किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी त्यांच्या चकलीला आणि लाडूला मोठी मागणी असते. यामध्ये त्यांना त्यांच्या संपूर्ण कुटुंब साथ देतो. त्यांची जाऊ दीर आणि नवरा हे सर्वजण मिळून त्यांना व्यवसायामध्ये मदत करतात. आता सध्याला त्यात चकली आणि लाडू बरोबर शेव त्याचबरोबर चिवडा आणि वेगळ्या शेंगदाण्याचे प्रकार त्यांच्याकडे आहेत. अशा पद्धतीने त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. सध्याला या व्यवसायामधून महिन्याकाठी त्या 80 ते 90 हजारापर्यंत उत्पन्न कमवत आहेत.
advertisement
अशा पद्धतीने शिल्पा यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केलेल्या आहे आणि आता  या व्यवसायामधून त्या महिन्याकाठी चांगलं उत्पन्न देखील कमावत आहेत. इतर मला देखील त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतःसाठी काहीतरी व्यवसाय नक्की सुरू करू शकतो.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चकली आणि लाडूला भन्नाट चव, खाताच लागेल टेस्ट; शून्यातून उभा केलेला व्यवसाय आज गाजवतोय अख्खं मार्केट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement