ओम शांती ओम गाण्यावर सुप्रिया सुळे थिरकल्या, कंगना राणावत आणि खासदार महुआ देखील तुफान नाचल्या
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Supriya Sule Dance Om Shanti Om Song: खासदार नवीन जिंदाल यांच्या लेकीच्या लग्नसोहळ्यात महिला खासदारांच्या सादरीकरणाने चार चाँद लावले.
नवी दिल्ली: खासदार नवीन जिंदाल यांच्या लेकीच्या लग्नात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि भाजपच्या खासदार अभिनेत्री कंगना राणावत थिरकल्या. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याच्या गाजलेल्या ओम शांती चित्रपटातील गाण्यावर महिला खासदारांनी ठेका धरला. एरवी संसदेत भाषणं करणाऱ्या, एखाद्या विधेयकावर अभ्यासूपणाने मतं मांडणाऱ्या सुप्रिया सुळे यांचे यानिमित्ताने नृत्य कलेतील प्राविण्य महाराष्ट्राला बघायला मिळाले.
खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नानिमित होणाऱ्या संगीत सोहळ्यासाठी सर्वपक्षीय महिला खासदारांनी नृत्याची रंगीत तालीम केली होती. भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकून यासंबंधीची माहिती दिली होती. शनिवारी रात्री महिला खासदारांनी सराव केल्याप्रमाणे ओम शांती ओम चित्रपटातील गीतावर नृत्याचे सादरीकरण केले.
सुप्रिया सुळे थिरकल्या, कंगना राणावत आणि खासदार महुआ देखील तुफान नाचल्या
advertisement
भाजपच्या खासदार कंगना राणावत यांची पार्श्वभूमी तशी सिने जगताशी संबंधित, त्यामुळे त्यांना नृत्य करणे किंवा सराव करणे फारसे कठीण गेले नाही. मात्र सुप्रिया सुळे आणि महुआ मोईत्रा यांना ओम शांती ओम गाण्यावरील 'हुक स्टेप' शिकण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले. त्यासाठी त्यांनी एक दोन वेळा रंगीत तालीमही केली. खासदार नवीन जिंदाल यांच्या लेकीच्या लग्नसोहळ्यात महिला खासदारांच्या सादरीकरणाने चार चाँद लावले.
advertisement
Kangana Ranaut, Mahua Moitra, Supriya Sule performing in wedding of Naveen Jindal’s daughter pic.twitter.com/lARD6SVRuU
— Angoori (@Rodrigo60776560) December 6, 2025
ज्यांच्यासाठी महिला खासदारांचा 'नाच', ते नवीन जिंदाल कोण आहेत?
उद्योगपती आणि जिंदाल स्टील अँड पॉवरचे अध्यक्ष नवीन जिंदाल यांनी २००४ मध्ये कुरुक्षेत्रातून काँग्रेस खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला. जिंदाल २००९ मध्ये पुन्हा निवडून आले. २०१४ नंतरच्या काळात त्यांचे काँग्रेस पक्षात मन रमेनासे झाले. २०२४ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर कुरुक्षेत्र हरियाणा येथून निवडणूक लढवली आणि पुन्हा संसदेत पाऊल ठेवले.
advertisement
नवीन जिंदाल यांची राजकीय मुळे खोलवर रुजलेली आहेत. त्यांच्या आई सावित्री जिंदाल यांनी पतीच्या ओ.पी.यांच्या जाण्यानंतर सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवले. २००५ ची हिसार पोटनिवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकली. २००९ मध्येही त्यांनी विजय प्राप्त केला. हरियाणाच्या माजी कॅबिनेट मंत्री असलेल्या सावित्री राज्यातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनल्या. २०१४ मध्ये पराभव झाल्यानंतर, आणि २०२९ ला पराभूत झाल्यानंतर त्यांचेही मन काँग्रेसमध्ये रमले नाही. २०२४ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली. २०२४ ची हरियाणा विधानसभा निवडणूक भाजपच्या पाठिंब्यावर त्यांनी हिसारमधून अपक्ष म्हणून लढवली, मतदारांनी साथ दिल्याने त्यांनी हिसारमधून विजय मिळवला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 3:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ओम शांती ओम गाण्यावर सुप्रिया सुळे थिरकल्या, कंगना राणावत आणि खासदार महुआ देखील तुफान नाचल्या


