जामखेडच्या डुकराच्या मटणाचा उल्लेख, विधानसभेत राडा, रोहित पवार-सुरेश धस भिडले

Last Updated:

जामखेड मतदारसंघाबद्दल वापरलेल्या एक शब्दावरून आमदार सुरेश धस आणि आमदार रोहित पवार यांच्यात जुंपली.

सुरेश धस-रोहित पवार
सुरेश धस-रोहित पवार
नागपूर : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभा सभागृहात बोलताना जामखेड मतदारसंघाबाबतीत बदनामीकारक उल्लेख केला असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. भाषणात सांकेतिक उदाहरण देऊन तुमचा मुद्दा तुम्हाला पूर्ण करता आला असता पण मतदारसंघाबद्दल बदानामीकारक बोलू नका, असे रोहित पवार संतापून म्हणाले. त्यांचा आक्रमकपणा पाहून सुरेश धस यांनीही एक पाऊल मागे घेत तो शब्द मागे घेत असल्याचे सांगितले.
काही जणांनी हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप केलेल्या आहेत. काही ठिकाणी या प्रकरणावरून मारहाणीसारखे प्रकार झाले असे राष्ट्रवादीचे नेते, आमदार जयंत पाटील म्हणाले. त्यावर आक्षेप घेऊन सुरेश धस तावातावाने जयंत पाटील यांना उत्तर द्यायला उभे राहिले. जामखेड मतदारसंघात एका ठिकाणी डुकराचे मटण आणि दारू मिळते, तिथे मारामारी झाली. असल्या प्रकरणात मीच मारहाण केली असे माझ्यावर आरोप केले जातात, असे सुरेश धस म्हणाले. त्यांच्या बोलण्यातल्या जामखेड मतदारसंघात डुकराचे मटण मिळते, या वाक्यावर रोहित पवार यांनी आक्षेप नोंदवला.
advertisement

रोहित पवारांचा आक्षेप, अध्यक्षांनी तो शब्द रेकॉर्डवरून काढला

विधानसभेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहात बोलताना जामखेडचा बदनामीकारक उल्लेख केला होता. जामखेडमध्ये डुकराचे मटण मिळते, असे ते म्हणाले. यासंदर्भात तातडीने तालिका अध्यक्षांना विनंती करून संबंधित बदनामीकारक उल्लेख रेकॉर्डवरून काढण्याची विनंती केली आणि ती विनंती अध्यक्ष महोदयांनी मान्य केली याबाबत त्यांचे आभार! कर्जत जामखेड ही पुण्यभूमी असून इथल्या मातीची बदनामी कोणीही केली तरी ती कदापि सहन केली जाणार नाही, असे रोहित पवार म्हणाले.
advertisement

सुरेश धस आणि रोहित पवार जुंपली

सुरेश धस आणि रोहित पवार यांच्यामध्ये मतदारसंघाच्या बदनामीवरून जुंपली. यावेळी सुरेश धस यांनी एक पाऊल मागे घेऊन मतदारसंघाच्या बदनामीचा माझा उद्देश नसल्याचे सांगत तो शब्द मागे घेत असल्याचे सांगितले. जयंत पाटील यांनीही याप्रकरणात सुरेश धस यांना चिमटे काढले. मी कुणाचेही नाव न घेता भाषण केले. परंतु अंगावर कसे ओढून घ्यायचे, याचा वस्तुपाठ आज सुरेश धस यांनी घालून दिल्याचे जयंत पाटील म्हणाले. त्यावर सुरेश धस यांच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जामखेडच्या डुकराच्या मटणाचा उल्लेख, विधानसभेत राडा, रोहित पवार-सुरेश धस भिडले
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement