रुपाली चाकणकर मृत डॉक्टरची बदनामी करतायेत, २ लोकांसोबत चॅट केली म्हणजे.... अंधारे संतापल्या
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषद घेतली.
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये जाऊन एक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वाचविण्यासाठीच घेतली होती. पीडितेला न्याय मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे सोडून रुपाली चाकणकर मृत डॉक्टरची बदनामी करतायेत, असा आरोप करीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लक्ष घालून जबाबदार माणसाला आयोगावर नेमाने आणि आयोगाची इभ्रत राखावी, असे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नाईक निंबाळकर हे पोलिसांवर दबाव टाकून सामान्य लोकांना त्रास देत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. तसेच या अनुषंगाने त्यांनी काही कॉल रेकॉड्स ऐकवल्या.
advertisement
वर्षा आणि हर्षा यांच्या प्रकरणात चाकणकरांनी काय केले?
वर्षा आणि हर्षा या जुळ्या बहिणींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उल्लेख होता. ज्यांच्या फिर्यादीवरून वर्षा आणि हर्षा यांच्या वडिलांना अटक झाली त्यांच्याकडे समझोत्यासाठी त्या गेल्या असता माझ्यावर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दबाव असल्याचे संबंधित फिर्यादीने सांगितले, असा उल्लेख वर्षा आणि हर्षा यांनी सुसाईडमध्ये नोटमध्ये केला होता. तसेच हे पत्र त्यांनी महिला आयोगाकडे सुपूर्द केले होते. जर पत्रकार परिषद घ्यायची एवढीच हौस असेल तर मग चाकणकर यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद का घेतली नाही? असा सवाल अंधारे यांनी विचारला.
advertisement
२ लोकांसोबत चॅट केली म्हणजे.... अंधारे संतापल्या
रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये जाऊन घेतलेल्या पत्रकार परिषदेत मृत डॉक्टर युवतीचे चारित्र्यहनन केले. ती मुलगी किती जणांशी मोबाईलवरून बोलत होती, याची माहिती माध्यमांसमोर दिली. जरी ती दोन मुलांबरोबर बोलत असेल तरी तिला मारण्याचा अधिकार कुणी दिली? ती गेल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? असे सवाल अंधारे यांनी चाकणकरांना विचारले.
advertisement
तटकरे यांनी लक्ष द्यावे, पक्षाला बदनाम होऊ देऊ नका
तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महिला आयोग अध्यक्षांच्या नियुक्ती प्रकरणात लक्ष घालून जबाबदार व्यक्तीला पदावर नेमावे. राजकीय पुनर्वसनासाठी पदाचा वापर होऊ देऊ नका. पक्षाची आणि महिला आयोगाची इभ्रत राखा, असेही अंधारे तटकरेंना उद्देशून म्हणाल्या.
निंबाळकर यांच्या ५० कोटीच्या दाव्याला मी घाबरत नाही
advertisement
रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी ठोकलेल्या ५० कोटीच्या दाव्याला मी घाबरत नाही. माझ्याकडे अजिबातच पैसे नाहीत. माझ्याकडे त्यांच्यासारखे साखर कारखाने, बँका नाहीत. जरी द्यायचे म्हटले तरी त्यांच्याकडून व्याजाने पैसे घ्यावे लागतील किंवा उसने घेऊन द्यावे लागतील. मी २ तारखेला फलटणमध्ये येतीये, तुम्हाला माझ्यावर काय मारेकरी घालायचे आहेत ते घाला... असे आव्हान अंधारे यांनी दिले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 5:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रुपाली चाकणकर मृत डॉक्टरची बदनामी करतायेत, २ लोकांसोबत चॅट केली म्हणजे.... अंधारे संतापल्या


