ओबीसी आरक्षण संपेल भीतीपोटी एकाने आयुष्य संपवले, कुटुंबाकरिता तानाजी सावंत धावले, लाखमोलाची मदत

Last Updated:

OBC Reservation: राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला होता, त्याची भीती चार दिवसांपूर्वी माणिक भालचंद्र डोईफोडे यांनी कुटुंबासमोर व्यक्त केली होती.

तानाजी सावंत
तानाजी सावंत
धाराशिव : वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा येथील माणिक भालचंद्र डोईफोडे यांनी काल ओबीसी आरक्षणाच्या नरेशातून शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पीडित कुटुंबाला आमदार तानाजी सावंत यांनी अडीच लाखाची आर्थिक मदत केली आहे.
सदर शेतकरी अल्पभूधारक असल्याने आणि कुटुंबात इतर कोणीही कमावणारे नसल्याने, मुलाचे शिक्षण आणि ओबीसी मराठा आरक्षणाच्या या वातावरणात आपल्या मनावर खोलवर परिणाम झाल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा आरोप कुटुंबाने केला. मराठा असो किंवा ओबीसी आत्महत्या हा आरक्षणाला पर्याय नाही, त्यामुळे आत्महत्या करू नका असे आवाहन माजी मंत्री तानाजी सावंत यांनी कुटुंबीयांना केले. सावंत यांनी पीडित कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
advertisement
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला होता, त्याची भीती चार दिवसांपूर्वी माणिक भालचंद्र डोईफोडे यांनी कुटुंबासमोर व्यक्त केली होती. माझ्या मुलांना याचा फटका बसेल, अशी चिंता त्यांनी बोलून दाखवली होती. याच कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा धाराशिवमध्ये आहे. तशी तक्रारही पोलिसांत दिली गेली. या घटनेनंतर आमदार तानाजी सावंत यांनी अडीच लाख रुपयांची मदत आणि मुलांना शिक्षणासाठी काही मदत लागल्यास मदत करण्याची हमी देखील दिली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ओबीसी आरक्षण संपेल भीतीपोटी एकाने आयुष्य संपवले, कुटुंबाकरिता तानाजी सावंत धावले, लाखमोलाची मदत
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement