शिक्षण दहावी पास, अनेकांनी मारले टोमणे, पण जिद्दीच्या बळावर सुरू केला व्यवसाय, ठाण्यातील महिलेचा प्रेरणादायी प्रवास, VIDEO

Last Updated:

निशा यांचे शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झाले आहे.असे असले तरीसुद्धा कुठलीही खंत न बाळगता आणि इतरांच्या हाताखाली काम न करता त्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा होता. त्यांचा हा प्रवास निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

+
दिव्यातील

दिव्यातील निशा पालशेतकर

साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : एखाद्या महिलेने ठरवले तर ती कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकते, असे म्हटले जाते.याचे उत्तम उदाहरण, दिव्यातील निशा पालशेतकर या आहेत.त्या फक्त दहावी पास आहेत. मात्र, त्यांनी व्यवसाय सुरू केला तेव्हा अनेकांनी त्यांना टोमणे मोरले. मात्र, त्यांनी हार मानली नाही. आज त्या यशस्वीपणे आपले फूड स्टॉल चालवत आहेत. जाणून घेऊयात, त्यांची ही प्रेरणादायी कहाणी.
advertisement
दिवा स्टेशनपासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर निशा घरकुल हे फूड स्टॉल आहे. निशा स्वतः हे फूड स्टॉल चालवतात. निशा यांचे शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झाले आहे.असे असले तरीसुद्धा कुठलीही खंत न बाळगता आणि इतरांच्या हाताखाली काम न करता त्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा होता. त्यामुळे त्यांनी हा छोटासा निशा घरकुल नावाचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या इथे मिळणारा साबुदाणा वडा आणि वडापावला खवय्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
advertisement
निशा यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी पतीला हातभार म्हणून हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी त्या घरातूनच चपात्यांचा व्यवसाय करायच्या. पण त्यात त्यांना आर्थिक फायदा होत नव्हता. म्हणूनच, त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच ठरवले. आता त्यांच्या दुकानात दररोज 100 ते 150 लोक तरी येतात. त्यामुळे त्यांच्या पतीलासुद्धा त्यांना आर्थिक बाबतीत हातभार लावायला जमू लागले आहे.
advertisement
निरलेक्सच्या तव्यावर कोकणी पद्धतीने बनवा झटपट घावणे, चव अशी की पुन्हा बनवाल, सोप्या रेसिपीचा VIDEO
शिक्षण कमी असल्याने त्यांना अनेक जणांनी तू व्यवसाय करू शकणार नाहीस, असे देखील म्हटले. मात्र, सध्याची त्यांची प्रगती पाहता सगळेच जण त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. त्यांच्या इथे मिळणारे घरगुती जेवण सर्वजण अगदी आवडीने खातात. त्या वेगवेगळ्या जेवणाच्या आणि पार्टीच्याही ऑर्डर घेतात.
advertisement
'लग्नानंतरच माझी स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा होती. पूर्वी मी चपात्यांचा व्यवसाय करत होते. मात्र, त्यात फार फायदा होत नव्हता. म्हणुनच मी हा व्यवसाय करायला सुरुवात केली. या व्यवसायामुळे खवय्यांचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे,'असे निशा यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले.
advertisement
परिस्थिती किती बिकट असली तरी जिद्द असेल तर कोणतीही महिला ही आपली स्वप्न करू शकते, हे निशा यांनी सिद्ध केले आहे. त्यांचा हा प्रवास निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
शिक्षण दहावी पास, अनेकांनी मारले टोमणे, पण जिद्दीच्या बळावर सुरू केला व्यवसाय, ठाण्यातील महिलेचा प्रेरणादायी प्रवास, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement