कोकणातील प्रसिद्ध कोंबडी वडे कसे बनवतात, ही आहे अगदीच सोपी पद्धत, रेसिपीचा VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
konkans famous chicken vada - हे खाण्यासाठी सगळ्यांना आवडतात. मात्र, ते बनवणे फार कठीण आहे. म्हणून आज हीच रेसिपी आपण अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात म्हणजे तुम्हीही तुमच्या घरी पटकन बनवू शकता.
साक्षी मराठी, प्रतिनिधी
ठाणे - कोकणात सगळ्यात जास्त कोंबडी वडे हा पदार्थ प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या घरगुती पिठापासून हे कोंबडी वडे बनवले जातात. हॉटेलमध्ये या कोंबडी वड्यांची किंमत 200 ते 300 रुपये असते. हे खाण्यासाठी सगळ्यांना आवडतात. मात्र, ते बनवणे फार कठीण आहे. म्हणून आज हीच रेसिपी आपण अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात म्हणजे तुम्हीही तुमच्या घरी पटकन बनवू शकता.
advertisement
साहित्य - तांदळाचे पीठ एक वाटी, अर्धा वाटी रवा, हळद, धना पावडर, गरम मसाला, एक वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी बेसन, भाताची पेज आणि चवीपुरते मीठ.
कृती - सर्वप्रथम साहित्यात सांगितलेले तांदळाचे पीठ एक वाटी, अर्धा वाटी रवा, हळद, धना पावडर, गरम मसाला, एक वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी बेसन, भाताची पेज या सगळ्या गोष्टी एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यात थोडे चवीपुरतं मीठ टाकून पुन्हा पीठ मळून घ्या. यामध्ये तांदळाचे पीठ असल्यामुळे तुमचे मळलेले पीठ थोडेसे चिकट होईल.
advertisement
स्पेशल पुणेरी भेळ, 82 वर्षांची आहे परंपरा, पण नेमकी मिळते कुठे? VIDEO
पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर अर्धा तास त्याला झाकून ठेवा. अर्धा तासाने वडे करण्यासाठी पोळी पाटावर छोटी प्लास्टिकची पिशवी घ्या. त्यावर थोडे पाणी लावून वडा थापून घ्या. हा थापलेला वडा गरम गरम तेलात सोडा. अशा पद्धतीने सगळे वडे तळून घ्या. वड्याचा रंग सोनेरी झाल्यानंतर त्यांना तेलातून बाहेर काढा.
advertisement
अशा पद्धतीने आपले गरमागरम आणि सोप्या पद्धतीने चिकन वडे तयार होतील. तुम्ही हे वडे चिकन बरोबर खाऊ शकता.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 30, 2024 1:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
कोकणातील प्रसिद्ध कोंबडी वडे कसे बनवतात, ही आहे अगदीच सोपी पद्धत, रेसिपीचा VIDEO