स्वातंत्र्यदिनी डोंबिवलीमध्ये वेगळा उपक्रम, KDMC ने घेतला पुढाकार!
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
स्वातंत्र्यदिनी शहीद सैनिकांच्या आठवणीसाठी एक खास उपक्रम राबवण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेनं घेतलाय.
डोंबिवली, 10 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्तानं 'हर घर तिरंगा' ही मोहीम गेल्या वर्षी केंद्र सरकारनं राबवली. यावर्षी देखील ही योजना पुन्हा एकदा राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेने ध्वज केंद्राचे उद्घाटन केले असून नागरिकांनी हे ध्वज घरी घेऊन जावे आणि 15 ऑगस्टला प्रत्येकाने आपल्या घरावर हा तिरंगा फडकवावा, असं आवाहन पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी केलंय. त्याचबरोबर शहीद सैनिकांच्या आठवणीसाठी एक खास उपक्रम राबवण्याची घोषणा देखील आयुक्तांनी केलीय.
काय आहे योजना?
देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांची नावं 15 ऑगस्ट रोजी नावे एका झेंड्यावर कोरण्यात येणार आहे. हा झेंडा सजवण्यात येईल त्यानंतर तो महापालिका आवारात लावण्यात येईल. शीलाफलकम असं या उपक्रमाचं नाव आहे. या उपक्रमातून देशासाठी सर्वस्व वेचणाऱ्या सैनिकांची किर्ती पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यात मदत होईल. शहीदांची आठवण राहील आणि त्यांची कीर्ती पुढील पिढी पर्यंत पोहचण्यास मदत होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलाय.
advertisement
माझी माती माझा देश या संकल्पनेवर आधारित एक पणती हातात घेऊन फोटो काढावे आणि केंद्र सरकारच्या माझी मती माझा देश या वेब पोर्टल वर अपलोड करावे असे आवाहन देखील आयुक्तांनी केलंय.
या दरम्यान महापालिका परिक्षेत्रात वृक्षारोपण करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आजूबाजूच्या परिसरात वृक्ष रोपण करावे, असंही आयुक्तांनी यावेळी सांगितलंय.
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
August 10, 2023 4:35 PM IST