घरातील कुकरमध्ये बनवा ढोकळा तेही अगदी झटपट, रेसिपी अशी की होतील मऊ अन् लुसलुशीत, VIDEO

Last Updated:

delicious khamang dhokla recipe - घरातील कुकरमध्ये सुद्धा वाफ देऊन तुम्ही हा ढोकळा बनवू शकता. मऊ लुसलुशीत ढोकळा घरच्या घरी, कुकरमध्ये कसा बनवावा, हे जाणून घेऊयात.

+
स्वादिष्ट

स्वादिष्ट खमंग ढोकळा रेसिपी

साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे - ढोकळा हा पदार्थ सगळ्यांना खूपच आवडतो. ढोकळा घरच्या घरी बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. चण्याचे पीठ आणि रवा याच्या मदतीने तुम्ही हा ढोकळा तयार करू शकता. घरातील कुकरमध्ये सुद्धा वाफ देऊन तुम्ही हा ढोकळा बनवू शकता. मऊ लुसलुशीत ढोकळा घरच्या घरी, कुकरमध्ये कसा बनवावा, हे जाणून घेऊयात.
ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य - एक वाटी भिजवून घेतलेला रवा, एक वाटी चणा डाळीचे पीठ, हळद, मीठ, तेल, इनो किंवा खायचा सोडा.
advertisement
कृती - सर्वप्रथम एका भांड्यात भिजवलेला रवा घ्यावा, त्यात एक वाटी चणा डाळीचे पीठ घालून, त्यात गरज असेल तेवढं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. मग त्यामध्ये हळद, मीठ आणि तेल घालून पुन्हा एकत्र करुन घ्यावं. मिश्रण एकजीव झाल्यानंतर एका भांड्यात तेल लावून त्यात ते मिश्रण घालावे. कुकरची शिट्टी काढून ते भांड कुकरमध्ये ठेवावे आणि कुकरचे झाकण लावून घ्यावे. साधारण 20 मिनिटानंतर गॅस बंद करुन थोडी वाफ गेल्यानंतर आपला ढोकळा बाहेर काढावा आणि त्याची व्यवस्थित पीस करून ताटात वाढावे.
advertisement
ढोकळ्यावरील तडका बनवण्यासाठी साहित्य - दोन चमचे तेल, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, लिंबू, राई, पाणी, चवीपुरती साखर आणि मीठ.
कृती - सर्वप्रथम कढईत दोन चमचे तेल घालून त्यात राई, कढीपत्ता, मिरची आणि थोडी कोथिंबीर घालून मिक्स करावे.त्यानंतर त्यात लिंबू पिळून घेतल्यानंतर, त्यात चवीपुरती साखर आणि मीठ घालून पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यावे. अशाप्रकारे आपला तडका तयार आहे.
advertisement
ताटात काढून घेतलेल्या ढोकळ्यावर हा तडका घालावा. अशा पद्धतीने तुम्ही मऊ आणि लुसलुशीत ढोकळा तयार करू शकता. तसेच तुम्ही तो चटणीबरोबरही किंवा असाच खाऊ शकता.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
घरातील कुकरमध्ये बनवा ढोकळा तेही अगदी झटपट, रेसिपी अशी की होतील मऊ अन् लुसलुशीत, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement