डोंबिवलीत आई अन् लेकीने मिळुन चालू केले फूड स्टॉल, आता दिवसाला 5 हजाराहून अधिक रुपयांची कमाई, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
तुम्हालाही जर वडापावचे वेगवेगळे फ्युजन ट्राय करायचे असतील तर डोंबिवलीतील या प्रसिद्ध टेस्ट ऑफ डोंबिवलीकर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या फास्ट फुड टेबल दुकानाला नक्की भेट देऊ शकता आणि चविष्ट दाबेली आणि वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव खाऊ शकतात.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे - डोंबिवली म्हणजे अस्सल खवय्यांचे शहर म्हटले जाते. याच डोंबिवलीत एक अस दुकाने आहे, जिथे स्वादिष्ट वडापाव मिळतात. फास्ट फूड टेबल असे या दुकानाचे नाव असून डोंबिवलीतील फडके रोडवर अंबिका हॉटेलच्या अगदी मागेच हे फूड स्टॉल आहे.
हे फास्ट फूड टेबल नावाचे दुकान 2 वर्षांपूर्वी आई आणि मुलीने एकत्र मिळुन सुरू केले. आई दिपा आणि ते लेक सिद्धी या दोघींनी मिळुन हे फ्युजन वडापावचे दुकान फक्त आवड म्हणून सुरू केले होते. आज त्यांच्या या वडापावच्या व्यवसायाची दिवसाची कमाई 5000 रुपयांहुन अधिक आहे.
advertisement
डोंबिवलीतील या दुकानात दहाहून अधिक प्रकारचे वडापाव मिळतात. यामध्ये साधा वडापाव, क्रिस्पी वडापाव, उलटा वडापाव, शेजवान वडापाव, चीज वडापाव, ठेचा वडापाव, पेरी पेरी वडापाव यांची किंमत फक्त 25 रुपयांपासून सुरू होते.
तर दाबेलीमध्येही 2 प्रकार इथे मिळतात. एक म्हणजे ग्रिल बटर दाबेली आणि ग्रील चीज दाबेली. या दोघांची चवही उत्तम आहे. या फूड स्टॉलची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत असून इथे मिळणारे सगळे प्रॉडक्ट होममेड असतात. अगदी पावापासून ते चटणीपर्यंत सगळे काही इथे या माय लेकी दोघी मिळून बनवतात.
advertisement
या दोघी फक्त हे दुकानाच चालवत नाही तर, पार्टी ऑर्डर सुद्धा घेतात. टेस्ट ऑफ डोंबिवलीकर म्हणून डोंबिवलीत ओळख असणारे हे दुकान या आई आणि मुलीमुळे खूप प्रसिद्ध झाले आहेत. 'आम्ही सुरुवातीला फक्त आवड, म्हणून या दुकानाची सुरुवात केली. परंतु आता डोंबिवलीकरांचा आमच्या दुकानाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये माझ्या मुलीचा देखील खूप मोठा वाटा आहे,' असे व्यावसायिका दीपा भानुशाली यांनी सांगितले.
advertisement
तुम्हालाही जर वडापावचे वेगवेगळे फ्युजन ट्राय करायचे असतील तर डोंबिवलीतील या प्रसिद्ध टेस्ट ऑफ डोंबिवलीकर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या फास्ट फुड टेबल दुकानाला नक्की भेट देऊ शकता आणि चविष्ट दाबेली आणि वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव खाऊ शकतात.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
September 18, 2024 6:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
डोंबिवलीत आई अन् लेकीने मिळुन चालू केले फूड स्टॉल, आता दिवसाला 5 हजाराहून अधिक रुपयांची कमाई, VIDEO