6 फ्लेवर्स, मिनरल वॉटरचा वापर, कल्याणमध्ये मिळते गुजरातची प्रसिद्ध पाणीपुरी; खवय्यांची होते मोठी गर्दी, लोकेशन काय?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Piyush Patil
Last Updated:
ही पाणीपुरी स्पेशल गुजरातची आहे. या 6 फ्लेवर्स असण्याचे मागचे कारण म्हणजे, हे सहा फ्लेवर्स शरीरासाठी उपयुक्त आहेत.
पियूष पाटील, प्रतिनिधी
कल्याण : ऋतू कोणताही असो, पण पाणीपुरीचे नाव काढलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. सध्या काही फूडमध्ये नवीन ट्रेंडिंग आलं की सगळेजण त्या ठिकाणी नवीन गोष्ट म्हणून ट्राय करायला जातात. त्यातच आता नवीन 6 वेगवेगळ्या फ्लेवरमधल्या पाणीपुरीची चर्चा होत आहे.
कल्याणमधील कॉमेडा हॉटेलच्या बाजूला श्री विनायक कोल्ड पाणीपुरीवाला उभा असतो. त्यांच्याकडे सहा वेगवेगळ्या प्रकारच्या पाणीपुरीचं पाणी मिळतं. पाणीपुरी सहा फ्लेवर्सवाली म्हणून तो फेमस झाला आहे. त्याच्याकडे रेग्युलर नंतर लिंबू, हाजमा, पुदिना, लसुण, जीरा, इ. प्रकारची पाणीपुरी मिळते.
advertisement
ही पाणीपुरी स्पेशल गुजरातची आहे. या 6 फ्लेवर्स असण्याचे मागचे कारण म्हणजे, हे सहा फ्लेवर्स शरीरासाठी उपयुक्त आहेत. या पाणीपुरीचे मालक म्हणतात की, “आमच्या पाणीपुरीचं पाणी हे शुद्ध असतं, आम्ही दररोज मिनरल वॉटरमधून पाणीपुरीचे पाणी बनवतो. त्यामुळे पावसाळ्यातही कोणाला त्रास होणार नाही, याची आम्ही दखल घेतो. आमच्या इथे नेहमीचे ग्राहकही येतात आणि दररोज नवीन ग्राहकही येतात.”
advertisement
याठिकाणी एका पाणीपुरीची प्लेट 25 रुपयांना मिळते. त्यात 6 फ्लेवर्स असतात. खवय्यांची याठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यांच्या या पाणीपुरीला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पाणीपुरीची दोन दुकाने आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
advertisement
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
July 13, 2024 3:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
6 फ्लेवर्स, मिनरल वॉटरचा वापर, कल्याणमध्ये मिळते गुजरातची प्रसिद्ध पाणीपुरी; खवय्यांची होते मोठी गर्दी, लोकेशन काय?