3 पिढ्यांनी सांभाळला व्यवसाय, अनेकजणांना 'ती' कला शिकवून दिला रोजगार
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
या वडिलोपार्जित व्यवसायात त्यांनी अजिबात खंड पडू दिला नाही. सध्या इथं 4 कामगार काम करतात.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : अनेकजण वडिलांचा व्यवसाय न सांभाळता स्वतःला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात यशस्वी करियर करतात. तर अनेकजण मात्र वडिलांचा व्यवसाय पुढे यशस्वीरित्या सांभाळतात. अशीच एक यशस्वी वडिलोपार्जित व्यवसायाची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत.
मकसूद पल्ला यांच्या वडिलांनी 1972 साली कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांची दुसरी आणि तिसरी पिढीही शिवणकाम करते. आज यातून महिन्याकाठी त्यांची 45 हजार रुपयांची उलाढाल होते.
advertisement
धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहराच्या मंडई पेठ परिसरात 'श्याम टेलर्स' हे कपडे शिवण्याचं दुकान आहे. 1972 साली सुरू झालेला हा व्यवसाय मकसूद यांची मुलं सांभाळतात.
या वडिलोपार्जित व्यवसायात त्यांनी अजिबात खंड पडू दिला नाही. सध्या इथं 4 कामगार काम करतात. मकसूद हे वयाच्या 67व्या वर्षीदेखील कपडे कटिंग करतात आणि ग्राहकांची ऑर्डर असल्यास गरजेनुसार कपडे शिवण्याचंही काम करतात. पल्ला यांनी पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय सांभाळला असून त्याचा विस्तार केला आहे. वर्षानुवर्षे या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. विशेष म्हणजे मकसूद हे केवळ आपला व्यवसाय सांभाळत नाहीत, तर त्यांनी समाजातील अनेक तरुणांना कपडे शिवायला शिकवलंय, ज्यामुळे कित्येकजणांनी स्वतः हा व्यवसाय सुरू केला आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
July 12, 2024 8:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
3 पिढ्यांनी सांभाळला व्यवसाय, अनेकजणांना 'ती' कला शिकवून दिला रोजगार