Thane Water Cut: ठाणेकर पाणी जपून वापरा, या भागात पाण्याचा थेंबही येणार नाही, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Thane Water Supply: ठाणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. बुधवारी काही भागात पाणीपुरवठा बंद राहील.
ठाणे : उन्हाळा वाढत असतानाच ठाणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मानकोली एम. बी. आर. येथे मुख्य जलवाहिनीस गळती बंद लागली असून ती बंद करणे आवश्यक आहे. यासाठी बुधवारी शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 9 एप्रिल रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहील, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आलीये.
12 तास पाणी बंद
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मानकोली एम.बी.आर येथील गळती बंद करणे आणि पिसे ते टेमघर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य अनधिकृत नळ जलवाहिनीवरील जोडण्या खंडित करण्यासाठी बुधवारी 12 तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे ठाणेकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागेल.
advertisement
या भागात पाणीबाणी
महापालिका पाणीपुरवठा योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा 12 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असून तातडीची कामे हाती घेण्यात येतील. त्यासाठी बुधवारी घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, समतानगर येथील पुरवठा बंद राहील.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
April 08, 2025 8:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane Water Cut: ठाणेकर पाणी जपून वापरा, या भागात पाण्याचा थेंबही येणार नाही, कारण काय?